केकला मिळाले ‘या’ जंगलाचे नाव
छायाचित्रकारांसाठी जणू नंदनवनच
तुम्ही अनेक जंगलांविषयी ऐकले असेल, परंतु कधी जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टविषयी ऐकले आहे का? जर्मनीच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रात वसलेले ब्लॅक फॉरेस्ट नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाचा एक मनमोहक विस्तार आहे. ब्लॅक फॉरेस्ट केकला याच जंगलाच्या नावावर हे नाव मिळाले आहे. येथील स्पा, उष्ण पाण्याचे झरे, खास कोकिळयुक्त घड्याळ अत्यंत प्रसिद्ध आहे. परंतु या जंगलाचे सौंदर्य पूर्ण जगात अन्यत्र कुठेच पहायला मिळत नाही.
जर्मनीत श्वार्जवाल्ड नावाने ओळखले जाणारे हे मनमोहक जंगल सुमारे 4600 चौरस मैल क्षेत्रात फैलावलेले आहे. हे जंगल स्वत:च्या घनदाट आणि सदाहरित झाडांसमवेत वन्यजीवन तसेच दुर्गम गावे आणि समृद्ध लोककथांसाठी प्रसिद्ध आहे. ब्लॅक फॉरेस्ट दीर्घकाळापासून लाकडाच्या उद्योगाशी जोडलेले आहे. हे जंगल विविध कारणांसाठी लाकडाचा एक स्थायी स्रोत प्रदान करते. ट्रायबर्ग आश्चर्यजनक ट्रायबर्ग झऱ्यांचे केंद्र आहे.
रोमवासीयांनी या जंगलाच्या पर्वतमालेला ‘ब्लॅक फॉरेस्ट’ नाव दिले होते. या क्षेत्रातील झाडे ही अत्यंत हिरव्या रंगाची असतात, प्रत्यक्षात हे जंगला काळ्या रंगाचे नाही, परंतु रोमवासीयांना हे भीतीदायक आणि काळोखाने भारलेले वाटले, कारण स्प्रूसच्या घनदाट आच्छादनामुळे येथे जमिनीवर कुठल्याही प्रकारचा प्रकाश पोहोचत नव्हता. याचमुळे याला सिल्वा निग्रा म्हणजेच ब्लॅक फॉरेस्ट नाव देण्यात आले.
याच जंगलाच्या नावावर जगात प्रसिद्ध ब्लॅक फॉरेस्ट केक मिळतात. ब्लॅक फॉरेस्ट हॅमची निर्मिती याच क्षेत्रातून झली आहे. तसेच ब्लॅक फॉरेसट गेटो देखील येथेच निर्माण झाला होता, ज्याला ब्लॅक फॉरेस्ट चेरी केक किंवा ब्लॅक फॉरेस्ट केक या नावानेही ओळखले जाते. याला चॉकलेट केक, क्रीम, आंबट चेरी आणि किर्शनद्वारे तयार केले जाते. याच फ्लेवरची पेस्ट्री देखील प्रसिद्ध आहे. परंतु ब्लॅक फॉरेस्ट स्वत:च्या चवदार खाद्यपदार्थांच्या दीर्घ परंपरेसाठी ओळखले जाते. या क्षेत्रात किमान 17 मिशेलिन स्टारयुक्त रेस्टॉरंट आहेत.
ब्लॅक फॉरेस्टला कुकू क्लॉक्स किंवा कोकिळयुक्त घड्याळ्यांसाठी ओळखले जाते. हेच त्यांचे जन्मस्थान आहे. येथील कोकिळ घड्याळांच्या सर्वात प्रभावशाली संग्रहाला पाहण्यासाठी फर्टवांगेनमध्ये जर्मन कोकीळ घड्याळ संग्रहालयाला जाऊ शकतात. येथे येणारे लोक स्वत:च्या परतीच्या प्रवासावेळी एक कोकीळ घड्याळ सोबत घेऊन जाणे पसंत करतात. ते पारंपरिक शिल्प कौशल्य आणि अचूक इंजिनियरिंगचे एक प्रतीक आहे.
ब्लॅक फॉरेस्टमधील उष्ण झरे अत्यंत लोकप्रिय आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करतात. रोमनांनी या सामुदायिक स्नानाचा प्रकाराला सुरू केले होते. जे बाडेन-बाडेन शहराच्या आसपास 12 थर्मल स्प्रिंग्स आणि 30 स्पासोबत आजही जारी आहे.