जिल्हा न्यायालयासमोरील बसथांबा पुन्हा उभारला
12:01 PM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हा न्यायालयापर्यंतच्या रस्त्यावरील जुने बसथांबे महिनाभरापूर्वी हटविण्यात आले होते. त्या ठिकाणी आता नवीन बसथांबे उभारण्यात आले आहेत. यामुळे बसने ये-जा करणाऱ्यांची सोय होत आहे. शहरात कांही वर्षांपूर्वी स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले होते. परंतु कांही वर्षांनी बसथांब्याची दुरवस्था झाली होती. काही बसथांब्यांचे छत कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात होती. याची दखल घेऊन जिल्हा न्यायालयासमोरील दोन बसथांबे हटविण्यात आले. महिनाभरानंतर या ठिकाणी आता नवीन बसथांबे उभारण्यात आले आहेत. या परिसरात न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे नागरिक, शालेय विद्यार्थी हे या बसथांब्यांचा आसरा घेत आहेत. बसथांबे उभारल्याने प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
Advertisement
Advertisement