कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मांढरदेव येथील बसथांब्याचे काम रखडले

05:37 PM Sep 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

वाई :

Advertisement

मागील दोन वर्षापासून कापूरहोळ, भोर, मांढरदेवी मार्गे वाईतील शहाबाग पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा रुंदीकरणाचे व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. भोरवरून मांढरदेवीला येणाऱ्या रस्त्याचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले असून. त्या रस्त्याने असणाऱ्या गावांच्या ठिकाणी बस थांबा शेड उभे केले आहेत. परंतु मांढरदेव येथील बस थांब्याचे काम आजमितील करण्यात न आल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement

मांढरदेव येथील बस थांबा शेड न उभारल्याने प्रवाशांसह देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असून मांढरदेव परिसरातील बस थांबा चोरीला गेला कि काय? या मांढरदेव बाबतीतच असा हलगर्जीपणा बांधकाम विभागाकडून का करण्यात येत आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बस थांब्यामुळे एसटीसाठी येणाऱ्या प्रवाशांना ऊन, वारा व पावसाच्या त्रासापासून वाचण्यासाठी या शेडचा वापर होत असतो. तसेच संपूर्ण वर्षभरात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात.

मांढरदेवीच्या पायथ्याशी असलेले कोचळेवाडी गाव या ठिकाणी असणाऱ्या भोर, वाई फाट्यावर असा बस थांबा शेड बनविण्यात आलेले आहे. मांढरदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी राज्यातून, परराज्यातून, देशातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या ठिकाणी वाई व भोर मार्गे येणाऱ्या बसची व इतर वाहनांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात असते. असे असताना देखील सगळे बस थांबा शेड उभे राहिलेले आहे. परंतु मांढरदेवीचे बस थांबा शेड अजून कसे झाले नाही. असा प्रश्न ग्रामस्थांसह भाविकांमधून विचारण्यात येत आहे. मांढरदेव हा परिसर डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी पावसाचे व हवेचे प्रमाणात जास्त असते. त्यामुळे बससाठी वाट पहात उभ्या असलेल्या प्रवाशांना निवाराची अत्यंत गरज असताना. भोर बांधकाम विभागाच्या गलथान पणामुळे बस थांबा शेड झाले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे

मांढरदेवी येथील सार्वजनिक ठिकाणी बस थांबा शेड उभे करण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर शेड उभारणीस काही स्थानिक लोकांनी हरकत घेतल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले तरी मांढरदेव ग्रामपंचायतीने त्यावर कारवाई करून होणारी लोकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, स्थानिक ग्रामस्थांसह भाविक आंदोलनच्या तयारीत आहेत

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article