कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजारात तेजीची वाटचाल कायम

06:03 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 294 अंकांनी वधारला : एचडीएफसी बँक चमकली

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचा कल दिसून आला. सलग तिसऱ्या सत्रात बाजार तेजीत राहिला, सेन्सेक्स 294 अंकांनी वाढत बंद झाला. एचडीएफसी बँक आणि महिंद्रा या समभागांची कामगिरी दमदार पाहायला मिळाली.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 294 अंकांनी वाढत 80796 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 114 अंकांच्या तेजीसोबत 24461 अंकांवर बंद झाला होता. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.5 टक्के वाढला तर स्मॉलकॅपही 1.3 टक्के वाढीसोबत व्यवहार करत होता. जागतिक बाजारातील मिळत्याजुळत्या वातावरणामुळे भारतीय शेअरबाजाराने तिसऱ्या दिवशी तेजीचा प्रवास कायम ठेवला होता. खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक, ऑटो कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा तसेच अदानी पोर्टस् यांच्या समभागांनी बाजाराला तेजी देण्यात हातभार लावला. सकाळी सेन्सेक्स 80,661 अंकांवर तेजीसह खुला झाला होता तर दिवसभरात 81,049 अंकांपर्यंत मजलही मारली होती. तर निफ्टीही 24,419 अंकांवर सकारात्मक खुला झाला. एकावेळी निफ्टीने 24,526 अंकांपर्यंत झेप घेतली होती.

हे समभाग तेजीत

सेन्सेक्समधील अदानी पोर्टसचे समभाग सर्वाधिक 6.3 टक्के इतके तेजीत होते. यासोबत बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा आणि महिंद्रा, इटर्नल, आयटीसी, पॉवरग्रिड कॉपं आणि टाटा मोटर्स यांचे समभागदेखील तेजी दाखवत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे काही कंपन्यांचे समभाग घसरणीतही होते. यात कोटक महिंद्रा बँकेचे समभाग सर्वाधिक 4.5 टक्के इतके घसरणीत राहिले होते. एसबीआय, अॅक्सिस बँक, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागही नुकसानीसोबत बंद झालेले दिसले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article