For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करोशीच्या धर्तीवर होणार बिजगर्णी ग्राम पंचायतीची इमारत

10:55 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
करोशीच्या धर्तीवर होणार बिजगर्णी ग्राम पंचायतीची इमारत
Advertisement

करोशीला भेट देऊन केली पाहणी : सुसज्ज इमारत-हायटेक सुविधा निर्माण करण्याचा विचार

Advertisement

वार्ताहर/किणये

चिकोडी तालुक्यातील करोशी या ग्रामपंचायतीला राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. इथली इमारत अतिशय सुसज्ज अशी असून त्या इमारतीमध्ये सर्व हायटेक सुविधा आहेत. तसेच या ग्रामपंचायतीचे कामकाजही अत्याधुनिक पद्धतीचे आहे. याच करोशी ग्रामपंचायतच्या धर्तीवर बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतच्या इमारतीचे कामकाज करण्यात येणार आहे. नुकतेच ग्रामपंचायत सदस्यांनी या ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. बिजगर्णी ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून 75 लाखाचा निधी खर्च करून हायटेक व सर्वात मोठी आणि सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी दिली.

Advertisement

इंदिरानगरजवळ सध्या बिजगर्णी ग्रामपंचायतच्या इमारतीचे कामकाज जोमाने सुरू आहे. चिकोडी तालुक्यातील राज्य पुरस्कारप्राप्त करोशी ग्रामपंचायतीची इमारत बघण्यासारखी आहे. तसेच तिथले कामकाजही अगदी नीटनेटके असे आहे. त्यामुळेच बिजगर्णी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी करोशीला जाऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच अत्याधुनिक कक्ष कशा पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत त्याचीही पाहणी केली. या ग्रामपंचायतीच्या धर्तीवर बिजगर्णी ग्रामपंचायत इमारत बांधण्याचा आणि या ग्रामपंचायतीमध्ये हायटेक सुविधा उपलब्ध करण्याचा आपला संकल्प आहे, असेही यावेळी सदस्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक, उपाध्यक्ष नामदेव मोरे, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, पीडिओ रविकांत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित.

Advertisement
Tags :

.