म्हैसाळसह परीसरात मेंढपाळानी आपल्या नवीन मेंढ्यांसह पिलांना घातली लाख !
म्हैसाळ वार्ताहर
म्हैसाळ सह परीसरात मेंढपाळांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या मेंढ्यांना लाख घातली. प्रत्येक मेंढपाळांचे किमान ५० ते १०० मेंढ्यांचे कळप असतात. काही शेतात बसविण्यासाठी किंवा चराई करण्यासाठी २००-३०० मेंढ्या एकत्र करतात. अशा वेळी नेमकी आपली मेंढी कोणती हे ओळखणे एक कसोटीच असते मात्र याबाबतीत मैंढपाळ अत्यंत हुशार मानले जाते. रंग, कान, शेपटी किंवा कानावर कात्रीने केलेली विशिष्ट खूण चिन्ह ज्याचे त्यांना ठाऊक असते यावरून ते पटकन आपली मेंढी किंवा कोकरू, पिल्ले ओळखून बाजूला काढतात. हि अत्यंत कौतुकची बाब इतरांना वाटते.
यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेंढ्यांना लाख घालण्याचा कार्यक्रम दर वर्षी करतात. धनगर समाजातील मेंढपाळांनी आपल्या नवीन मेंढ्यांना कायमची ओळख म्हणून लाख घालतात. लाख म्हणजे आपली मेंढी कोणत्याही कळपात गेल्यास ती पटकन ओळखता यावी यासाठी विशिष्ट प्रकारची खूण ओळख चिन्ह मेढीं किंवा नवीन पिल्याच्या (कोकरू) कानावर कात्रीने करतात. दरवषी उत्तम दिवस म्हणून गुढीपाडव्याच्या सणाला आपल्या मेंढ्यांना पिलांना लाख घालतात.याशिवाय आपली खरी संपत्ती मेंढ्या असून त्यांची चांगली वाढ व्हावी.बरकत वाढावी म्हणुन गादी करून मेंढ्यांची पूजा केली जाते.आपल्या परमेश्वराला स्मरुन भंडारा उधळत आनंद उत्साह साजरा करतात.यावर्षी म्हैसाळ,नरवाड,शेडबाळ,कागवाड, विजयनगर आदि भागातील मेंढपाळांनी मेंढ्यांना लाक घालण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केला.यानिमित्ताने, पुरणपोळी,आंबिल चा नैवेद्य करून निमंत्रित पाहुण्यांसह वनभोजन करताता.