Solapur : सोलापुरातील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल होणार इतिहासजमा !
बार्शी आगाराच्या बसचा थरारक अपघात
सोलापूर : बार्शी-सोलापूर मार्गावर संतोषनगर परिसरात मंगळवारी रात्री एक थरारक घटना घडली. बार्शी आगाराच्या बसचे (एमएच ०६-एस ८३१०) अचानक ब्रेक फेल होउन अनियंत्रित झाल्याने दुभाजकाला धडकली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रात्री आठच्या सुमारास बार्शीहून सोलापूरकडे येणारी ही बस संतोषनगर परिसरात पोहोचली असता अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाने बस नियंत्रित करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. तथापि बस अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढली आणि तिथे उभ्या असलेल्या पुलाच्या भिंतीला धडकली. यावेळी बसचा तोल जाऊन ती समोरून येणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी कारवर (एमएच २४-बीएल २२६८) कोसळली.
या काळात रेल्वे प्रशासन १३ तासांचा मेगा ब्लॉक घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील. मात्र, पूल पाडण्यापूर्वी ५४ मीटर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. ठाकरे गटातर्फे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांपासून हा रस्ता अपूर्ण आहे. ज्यामुळे अवंतीनगर, अभिमानश्री नगर, यशनगर, अरविंदधाम, निराळे वस्ती, स्टेशन आणि दमाणीनगर परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
वाहतुकीवर मोठा परिणाम-शहरात कोंडीची शक्यता
रेल्वे पुलाचे पाडकाम सुरू होताच संपूर्ण सोलापूरच्या मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थेवर ताण येणार आहे. मरिआई चौक व भैय्या चौक परिसरात वाहनांची मोठी गर्दी होईल. सीएनएस हॉस्पिटलजवळचा मार्ग अद्याप अपूर्ण असल्याने पर्यायी रस्ता ठप्प. दमाणी नगर परिसरात ५४ मीटर रस्ता अपूर्ण असल्याने वाहतुकीचा दबाव दुप्पट वाढेल.
वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका
नवीन पूल होणार आधुनिक तंत्रज्ञानावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले असून, हायड्रोलिक ब्रेकर्स आणि कॉंक्रिट क्रशरच्या सहाय्याने पाडकाम केले जाणार आहे. नवीन पूल अधिक मजबूत, सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल.