7 शतकांपेक्षा जुना पूल महायुद्धातही टिकविले अस्तित्व
सर्वसाधारणपणे पूलाचे सौंदर्य, त्याची असामान्य मजबुती, वास्तुकला पाहणे लोक पसंत करतात. परंतु एखाद्या पूलावर बाजारपेठ, घरं आणि दुकानं पाहण्याची अपेक्षा कराल का? इटलीच्या फ्लोरेन्समध्ये असलेला पोंटे वेक्चेओ हा पूल याचे मोठे उदाहरण आहे. इतिहासाने समृद्ध पोंटे वेंक्चिओ जुन्या शहराच्या मधोमध असून तो ऐतिहासिक केंद्राला नदीच्या पलिकडील ओल्ट्रानोशी जोडतो. हा पूल 1345 मध्ये पूरानंतर निर्माण करण्यात आला होता. 1565 मध्ये अरनो नदीपर्यंत फैलावलेल्या या दगडाच्या पूलामध्ये आणखी मजला जोडण्यात आला. या दुसऱ्या मजल्यावर आता घरं आणि दुकाने निर्माण झाली आहेत.
इटालियन भाषेत पोंटे वेक्चिओचा अर्थ जुना पूल असा होता. याचमुळे हा शहरातील सर्वात जुना पूल आहे. अरनो नदीवर रोमन युगादरम्यान तेथे एक पूल होता असे सांगितले जाते, परंतु याच्या पुष्टीसाठी कुठलीही भौतिक खुणा किंवा दस्तऐवजस्वरुपी पुरावा अस्तित्वात नाही. येथील स्थायी पूलाचा सर्वात जुना पुरावा 10 व्या शतकातील आहे. तेथे काही प्रमाणात लाकडी संरचना होती, जी दीर्घकाळापर्यंत टिकणे शक्य नव्हते.
सध्या पोंटे वेक्चिओच्या जागी पहिले मध्ययुगीन पूल 1117 मधील पूरात वाहून गेला होता. यानंतर तेथील पूल अधिक टिकाऊ दगडांनी तयार करण्यात आला, परंतु तो देखील पूल वाहून गेला होता. यानंतर 1345 मध्ये नव्याने पूलनिर्मिती सुरू झाली आणि ती 5 वर्षांनी पूर्ण झाली होती. पूल हार्मोनिक गणितीय गुणोत्तराच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. याचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी इंजिनियरिंगसोबत टिकाऊ सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. याच्या चार भव्य टॉवर्सनी संरचनेला रक्षात्मक क्षमता प्रदान करण्याचे काम केले आहे.
शेकडो वर्षांपर्यंत मासेविक्रेते, कसाई आणि चामड्याचे कारागिल पूलावर स्वत:चा व्यापार करत राहिले. तर दुकानांना रस्तेमार्गावर एकाधिकार स्थापन करण्याची अनुमती नव्हती. याचमुळे पेंटे वेक्विचेओच्या दुकानांना अरर्नोवरच लाकडाच्या मदतीने निर्माण करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतरही टिकलेला हा फ्लोरेंसमधील एकमात्र पूल आहे. पूल वाचविण्यासाठी जर्मन मुत्सद्दी गेरहार्ड वुल्फ यांनी योगदान दिले होते. नाझी नेतृत्वाला त्यांनी फ्लोरेन्सचे पूल नष्ट न करण्याचा सल्ला दिला होता.