महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसामुळे पूल कोसळल्याने संपर्क तुटला

10:28 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजापूर जिल्ह्यातील घटना : वाहतूक विस्कळीत : नागरिकांची गैरसोय

Advertisement

वार्ताहर /विजापूर

Advertisement

जिल्ह्यातील मुडदेबिहाळ तालुक्यातील आडवी हुलगाबाला गावाकडून तांडा येथे जाणारा पूल पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोसळल्याने जनसंपर्क तुटला आहे. मुद्देबिहाळ शहरात 55.50 मि.मी., नलाटवाडा शहरात 40 मि.मी.,  ढवळगीमध्ये 120.00 मि.मी, तळीकोटमध्ये 77.30 मि. मी. पाऊस झाला आहे. नागरिकांनी मार्गक्रमण करताना सतर्क रहावे, असा इशारा तांडा येथील रहिवासी मिथुन चव्हाण यांनी दिला आहे. सदर परिस्थितीची दखल घेताना तालुका प्रशासनाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा येत्याकाळात तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बसू चव्हाण, शेखाप्पा चव्हाण, भीमाप्पा राठोड, नारायणप्पा चव्हाण, रुपसिंग चव्हाण, सोनूबाई चव्हाण, भीमूबाई चव्हाण, गुरुबाई राठोड यांनी दिला आहे. तसेच सदर पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. पावसामुळे डोणकामाडू पूल बुडाला. झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील डोणकामाडू ते मुद्देबिहाळ या रस्त्याला जोडणारा पूल पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे गावांचा  संपर्क तुटला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article