Satara News : साताऱ्यात बिबट्याचा हल्ला परतवणाऱ्या ‘राजा’ बैलाची शूर झुंज चर्चेत
साताऱ्यात बिबट्याचा बैलावर हल्ला
कास : आसनगाव खोऱ्यातील पिलाणी (खालची) ता. सातारा येथे शनिवारी दुपारी बिबट्या अन् बैलामध्ये निकराची झुंज झाली. यात बिबट्याचा हल्ला परतवण्यात बैल यशस्वी झाला. मात्र, बिबट्याशी झुंज देताना झालेल्या जखमा व शिंग मोडल्याने बैल रक्तबंबाळ झाला. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये नेहमीच बिबट्यांची दहशत पाहायला मिळत असून पाळीव प्राण्यांसोबत बिबट्याचा संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता पिलाणी (खालची) गावातील बळीराम विष्टुल कदम हे नेहमीप्रमाणे आपली खिलार जातीची बैलजोडी डोंगरात चरावयास घेऊन गेले होते. बैल चरत असताना दुपारच्या सत्रात अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने राजा नावाच्या बैलावर हल्ला केला.
त्याला बैलानेही जोरदार प्रतिकार केला. दोघांची बराच वेळ झुंज होती. आवाज येत असल्याने तेवून जवळच असलेल्या कदम यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे शेतकरी, गुराख्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.