हल्क होण्याच्या नादात शरीर झाले हिरवे
हल्क होण्याच्या नादात शरीर झाले हिरवे
सुपरहीरो हल्कप्रमाणे दिसण्याच्या नादात एका इसमाने स्वत:च्या पूर्ण शरीराला हिरव्या रंगात रंगवून घेतले आहे. स्वत:चा चेहरा, मान, हात-पाय आणि पूर्ण शरीरालाच त्याने रंगविले आहे. यानंतर जेव्हा त्याने हा रंग हटविण्याचा प्रयत्न केला तो साफच होत नव्हता.
बेनिडोर्ममध्ये एका ब्रिटिश नागरिकाला स्वत:च्या त्वचेवरून हिरवा रंग हटविण्यासाठी 6 वेळा स्नान करावे लागले. अनेक दिवसांपर्यंत स्टीम बाथ घ्यावा लागला. तरीही शरीरावरील हिरवा रंग कायम आहे. कारण त्याने हल्क होण्यासाठी मेकअपच्या जागी चुकून टेक्सटाइल पेंट म्हणजेच कपड्यांवर वापरला जाणारा रंग लावून घेतला होता.
मेकअप कलरच्या जागी पेंट
टीसाइड येथून आलेल्या एका पर्यटकाने स्वत:च्या अजब चुकीविषयी सांगितले आहे. या पर्यटकाचे नाव केन असून त्याला या चुकीमुळे तीन दिवसांमध्ये 6 वेळा स्नान करावे लागले आहे. केनने स्वत:च्या पूर्ण शरीराला टेक्सटाइल रंगाने रंगवून घेतले होते. पार्टी रिसॉर्टमध्ये एका रात्रीसाठी मार्वल सुपरहीरोप्रमाणे जाता यावे म्हणून त्याने हे कृत्य केले होते. त्याने मुलांच्या चेहऱ्यावर लावला जाणारा सामान्य रंग किंवा मेकअपऐवजी कपड्यांना रंगविण्यासाठी वापरण्यात येणारा रंग निवडला होता. उन्हाळ्यात घामामुळे सामान्य रंग उडू नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला होता.
अनेक दिवसांपर्यंत स्टीम
यानंतर केनची त्वचा अनेक दिवसांपर्यंत हिरव्या रंगाची राहिली. हे पाहून त्याचे मित्र देखील अत्यंत हैराण झाले. त्वचेवरून हिरवा रंग हटविण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, तरीही शरीरावर मोठा रंग लागलेला आहे. तीन दिवसांपर्यंत तो अनेक तासांपर्यंत स्टीम रुममध्ये राहिला, तरीही त्याचे डोके आणि मानेवरील रंग कायम असल्याचे केनचा मित्र ग्रॅहमने सांगितले.
प्रथम हातावर लावला होता रंग
केनने त्या दिवसापूर्वी स्वत:च्या हातांवर रंगाचे परीक्षण केले होते आणि तो लवकर धुवून टाकला होता. जेव्हा रंग त्याच्या त्वचेवर तासांपर्यंत राहिल्याने तो हटविण्यास त्याला मोठी मेहनत करावी लागली. परंतु दुर्दैवाने त्याने टेक्सटाइल रंगाचे 6 स्तर लावून घेतले होते. हे रात्री तर प्रभावी राहिले, परंतु नंतर त्याच्या त्वचेवरील हिरवा रंग कायम राहिला.
हल्क होण्याचा प्रयत्न
अथक प्रयत्नानंतरही अद्याप केनची मान आणि शरीराच्या काही हिस्स्यांवर हिरवा रंग लागलेला आहे. तसेच हात आणि पायाच्या हिस्स्यांमधील हिरवा रंग बऱ्याचअंशी निघून गेला आहे, तरीही तो दिसण्यास अजब वाटत आहे.