महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळणे येथील बेपत्ता राहुल जिकमडेचा मृतदेह नदीपात्रात सापडला

05:11 PM Aug 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

गळाने मासे पकडण्यासाठी गेलेला राहुल पुन्हा परतलाच नाही

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

Advertisement

मालवण तालुक्यातील बेळणे कुंभारवाडी येथील युवक राहुल कृष्णा जिकमडे, (वय १८ वर्ष) हा गुरुवारी दुपारी मासे पकडण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेला युवक बेपत्ता झाल्यानंतर नदीपत्रात ग्रामस्थ, प्रशासन , स्कुबा जवान व एन. डी . आर . एफ जवानांनी नदीमध्ये शोध मोहीम राबवली होती. मात्र तो सापडला नव्हता. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोंड येथे राहुल याचा मृतदेह नाडीपत्रात झाडीत अडकलेल्या स्थितीत शोध घेणाऱ्या ग्रामस्थांना सापडला.

गळ घेऊन मासे पकडण्यासाठी गेला होता राहुल

कणकवली येथील कॉलेज मधून दुपारी घरी आलेला राहुल नदीवर दुपारी २ च्या सुमारास मासे (पकडण्या) गरवण्यासाठी गेला होता दुपारी गेलेला राहुल हा सायंकाळी उशीरा पर्यंत घरी न आल्याने त्याच्या आईने वाडीतील ग्रामस्थांना सांगत शोधाशोध सुरु केली. परंतु शोधाशोध होउन सुध्दा न मिळाल्याने रात्री उशीरा आचरा पोलीसांना कळविण्यात आले होते. राहुल बेपत्ता झाल्याचे समजताच गुरुवारी रात्रीपासून श्रावण, असगणी राठीवडे येथील ग्रामस्थांनी त्याचा वेगाने शोध चालू ठेवला होता. राहुल याचा मोबाईल व अंगावरचे कपडे नदीकिनारी आढळून आल्याने राहुल हा नदीपात्रात पडला असल्याची शंका बळावली होती. स्थानिक ग्रामस्थ, स्कुबा जवान व एन डी आर एफ जवानानी नदीमध्ये शोध घेत होते . मात्र , गढूळ पाणी, पाण्याच्या प्रवाहाला असलेला वेग यामुळे अडचणी येत होत्या. तपास कामात आचरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी. ए. पोवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक टि. आर. पडवळ व हेड काॅन्स्टेबल एस. एम. तांबे. विशाल वैजल व पोलिस टिम बेपत्ता तरुणाचा शोध घेत होती. सामाजिक कार्यकर्ते प्रविण परब, कृष्णा हरणे, हेमंत पारकर, दिपक उर्फ बंडु चव्हाण, अमित फोंडके अवी कामतेकर, व अनेक ग्रामस्थ शोध घेत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवण तहसिलदार श्रीम. झालटे, श्रावण मंडळ अधिकारी अजय परब, रामगड सरपंच शुभम मटकर, रामगड तलाठी प्रभुदेसाई, रामगड पोलिस पाटील नारायण जिकमडे, श्रावण सरपंच सौ. नम्रता मुद्राळे दाखल झाले होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malvan # sindhudurg # dead body #
Next Article