महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलगावातील बेपत्ता युवकाचा मृतदेह माडखोल धरणात आढळला

11:42 AM Sep 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी-
कोलगाव येथील बेपत्ता युवक अक्षय जनार्दन साईल (वय 28 )  याचा माडखोल येथील धरणात गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. मंगळवारी सायंकाळपासून अक्षय हा बेपत्ता होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. मात्र , बुधवारी सकाळच्या दरम्यान अक्षयची दुचाकी आणि चप्पल येथील धरणालगत आढळून आले . त्यामुळे धरणात कोणीतरी बुडाल्याचा संशय बळावला होता. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांच्या उपस्थितीत बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती.मात्र,  बुधवारी धरणात कोणीही सापडले नाही. त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान, गुरुवार सकाळी माडखोल धरणात एक मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला.अधिक तपास केला असता तो मृतदेह कोलगाव येथील बेपत्ता असलेल्या अक्षय साईल याचाच असल्याचे उघड झाले. दरम्यान,  अक्षयची दुचाकी आणि चप्पल बुधवारी माडखोल धरणालगत आढळून आले. आता अक्षय माडखोल धरणात बुडाला की त्याने आत्महत्या केली ,याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun Bharat news update # tarun Bharat sindhudurg # tarun Bharat news # madkhol # kolgao #
Next Article