आज होणार निळ्या चंद्राचे दर्शन
06:07 AM Aug 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
Advertisement
आज सोमवारी रात्री आकाशात निळ्या बृहत चंद्राचे (सुपर ब्ल्यू मून) दर्शन होणार आहे. नारळी पौर्णिमेदिवशी हा योग जुळून आला आहे. हा मोठा निळा चंद्र यानंतरचे तीन दिवसही असेच दर्शन देणार आहे, अशी माहिती अमेरिकेच्या नासा या अवकाशसंशोधन संस्थेने दिली. चंद्राचे हे मनोहारी दर्शन पृथ्वीच्या सर्व भागांमधून होणार आहे, असेही नासाने रविवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
Advertisement
चंदाचे असे दर्शन ही खगोल शास्त्रज्ञ आणि खगोल प्रेमींसाठी एक पर्वणीच असते. त्यांना या निमित्ताने चंद्राचा सखोल अभ्यास करता येतो. या वर्षात असे बृहत चंद्र दर्शन चारवेळा होणार आहे. पुढच्या अशा चंद्राचे दर्शन 17 सप्टेंबर, त्यानंतर 17 ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर या दिवशीही होणार आहे. एका वर्षात चारवेळा अशा मोठ्या चंद्राचे दर्शन होणे ही दुर्मिळ घटना मानली जाते.
Advertisement
Next Article