For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील भाजप सरकार नेहमीच गरिबांविरोधात

10:24 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशातील भाजप सरकार नेहमीच गरिबांविरोधात
Advertisement

बेकवाड येथील प्रचारसभेत काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप

Advertisement

वार्ताहर /नंदगड

देशातील भाजप सरकारने गोरगरिबांचे कर्ज माफ करण्यापेक्षा अदानी, अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. त्यामुळे भाजपाचे सरकार गरिबांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप कारवार लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी केला. बेकवाड येथे काँग्रेस पक्षाची प्रचार बैठक झाली. यावेळी निंबाळकर बोलत होत्या.  यावेळी अॅड. ईश्वर घाडी, महादेव घाडी, जनकाप्पा पाटील, शिवराम पाटील, महादेव पाटील, शिवाजी आंबेवाडकर, जोतिबा शिवणगेकर, वैष्णवी पाटील, महादेव कोळी, सावित्री मादार आदींसह अन्य मान्यवर व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरही देशातील जनतेला काँग्रेसचे मोठे योगदान मिळाले. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात गोरगरीब जनतेसाठी विविध विकास योजना अमलात आणल्या आणि त्या प्रभावीपणे राबवल्या. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. कसेल त्यांची जमीन या धरतीखाली कुळ कायद्याने हजारो एकर जमीन गोरगरिबांना मिळवून दिली. बीजेपी पक्ष वेदांतावर चालतो, तर काँग्रेस पक्ष सिद्धांतावर चालतो. काँग्रेसने कारवार लोकसभा मतदारसंघासाठी मराठी भाषिक मराठा जातीचा उमेदवार दिला आहे. ही खानापूर तालुक्याच्या जनतेची स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे समस्त जनतेने अंजली निंबाळकर यांना विजयी करा, असे आवाहन केले.

Advertisement

तालुका पंचायत माजी सदस्य महादेव घाडी म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपण निवडून सत्तेत आल्यास पाच गॅरंटी योजना राबवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, युवा निधी, महिलांसाठी मोफत बसप्रवास, महिलांसाठी प्रति महिना दोन हजार रुपये अशा पाच योजना यशस्वीपणे राबविल्याने जनतेमध्ये काँग्रेसबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व लोक काँग्रेसला मतदान करतील, असा अभिप्राय व्यक्त केला. ब्रिटिशांनी भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी केली होती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य, आवश्यक ठिकाणी धरणे, पाणीपुरवठा व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. म्हणूनच आज देश प्रगतीपथावर असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्या सावित्री मादार यांनी, अंजली निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या पाच वर्षात खानापूर तालुक्याच्या विकासासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा मांडला. यावेळी उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या कार्याबद्दल व देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना केलेल्या विकास कामांबद्दल आढावा मांडणारी अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली. सभेला बेकवाड, झुंजवाड, हडलगा, गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.