रेस्टॉरंटमध्ये शरीरावर ठरते बिल
गजांमधून प्रवेश केल्यास मिळणार डिस्काउंट
थायलंडच्या चियांग माईमध्ये एका रेस्टॉरंटची नवी प्रमोशनल स्कीम सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. काही लोक याचे कौतुक करत आहेत, तर काही जण याला बॉडी शेमिंगच्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. .चियांग माई ब्रेकफास्ट वर्ल्ड नावाच्या या रेस्टॉरंटने एक असे चॅलेंज सुरू केले आहे, ज्यात ग्राहकाला त्याच्या शरीराच्या आकाराच्या आधारावर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाते. परंतु ग्राहकाने रेस्टॉरंटबाहेर असलेल्या मेटल बार्समधून स्वत:ला बाहेर काढून दाखविण्याची अट आहे.
स्लिम चॅलेंज
या चॅलेंजमध्ये 5 स्तर असतात, ज्यात प्रत्येक स्तरावर मेटल बार्समधील अंतर आणखी कमी होत जाते. जो ग्राह यात सर्वाधिक गॅप असलेल्या बार्समधून जातो, त्याला 5-15 टक्क्यांपर्यंत सूट मिळते, तर जो सर्वात कमी गॅपमधून बाहेर पडण्यास यशस्वी ठरतो, त्याला पूर्ण 20 टक्क्यांची सूट दिली जाते. तर जे लोक कुठल्याही स्तराला पार करू शकत नाहीत, त्यांना एक फलकाला सामोरे जावे लागते, त्यावर फुल प्राइस, सॉरी असे नमूद असते.
या चॅलेंजचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. थायलंडमध्ये हे रेस्टॉरंट केवळ स्लिम लोकांना सूट देते, आता हा व्हिडिओ समोर आल्यावर बॉडी शेमिंगवरून चर्चा सुरू झाली आहे.
आशियात डायट आणि बॉडी कल्चर पूर्वीच अत्यंत टॉक्सिक आहे, अशा स्थितीत या स्कीमने मर्यादाच ओलांडली असल्याची टिप्पणी एका युजरने केली आहे. तर ही कल्पना मूर्खपणाची आणि अनादर करणारी असल्याची प्रतिक्रिया अन्य युजरने व्यक्त केली आहे. परंतु काही लोकांना ही संकल्पना आवडली असून ते या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी रेस्टॉरंटला भेट देऊ इच्छित आहेत.