For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जगातील सर्वात मोठी बंदूक

06:40 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात मोठी बंदूक

फिट करण्यास लागायचे 250 लोक

Advertisement

श्वेरर गुस्तात ही जगातील सर्वात मोठी बंदूक होती, याची निर्मिती नाझी जर्मनीने केली होती. ही बंदूक 47.3 मीटर लांब, 7.1 मीटर रुंद आणि 11.6 मीटर उंच होती. या बंदुकीचे वजन 1350 टन इतके होते. मोठी आणि भरभक्कम असल्याने ही बंदूक फिट करण्यासाठी 250 लोकांची गरज भासत होती.

श्वेरर गुस्तात युद्धात वापरण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कॅलिबर रायफल होती. ही 47 किलोमीटरच्या अंतरापर्यंत 7 टन वजनाचे गोळे डागू शकत होती, ही बंदूक रेल्वेतून इतरत्र हलविण्यात येत होती. या बंदुकीतून डागण्यात येणाऱ्या गोळ्यांचा आकार 31 इंचापर्यंत असायचा. या बंदुकीची निर्मिती जर्मनीच्या ‘द क्रूप फॅमिली कंपनी’ने केली होती. याच कंपनीने पहिल्या महायुद्धात बिग बर्थ तोफा तयार केल्या होत्या.

Advertisement

युद्धाच्या त्या काळात जर्मनीचे नेते पूर्ण पश्चिम युरोप आणि युएसएसआर दोन्ही ठिकाणी स्वत:च्या शत्रूंना

Advertisement

पराभूत करण्यास मदत करू शकेल अशाप्रकारचे मोठे अस्त्र निर्माण करू इच्छित होते. विशेषकरून ही बंदूक फ्रेंच मॅजिनॉटन लाइनला नष्ट करण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. ही लाइन 1928 आणि 1940 दरम्यान फ्रान्सकडून जर्मनीचे आक्रमण रोखण्यासाठी तयार करण्यात आली होती.

श्वेरर गुस्तात एक उपयुक्त शस्त्र ठरले नव्हते, हे शस्त्र अयशस्वी ठरण्यामागे अनेक कारणे होती. ही बंदूक निर्माण करण्यास 1930 चे पूर्ण दशक लागले होते आणि जेव्हा नाझींनी पूर्ण पश्चिम युरोपमध्ये स्वत:चा ‘ब्लिट्सक्रेग’चे प्रदर्शन केले तेव्हा ही बंदूक तयार नवहती. तसेच कमी संख्येत गोळ्या डागण्यात आल्यावर ही बंदूक पुन्हा फिट करण्यासाठी सुमारे 250 लोकांची गरज भासत होती. ब्लिट्सक्रेग एक सैन्य रणनीति असून त्याच्या अंतर्गत सैन्य शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करून शत्रू सैन्यावर मनोवैज्ञानिक प्रहार केला जात होता.

Advertisement
Tags :
×

.