महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वनखात्याचे सौंदर्य वाढणार

11:38 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आवारात सुशोभिकरण कामाला वेग : नवीन रोपांची लागवड

Advertisement

बेळगाव : वनखाते कार्यालय आवारात सपाटीकरण करून सुशोभिकरणाच्या कामाला वेग आला आहे. धोकादायक झाडे, माती हटवून त्या ठिकाणी नवीन रोपे लावण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. विविध ठिकाणी रोप लागवड करून हिरवळ वाढविणाऱ्या वनखात्याच्या कार्यालयासमोर आता हिरवळ पसरणार आहे. विविध रोपांची झाडे लावून सौंदर्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती वनखात्याने दिली आहे. कार्यालयाच्या आवारात असलेली भली मोठी धोकादायक निलगिरीची झाडे हटविण्यात आली आहेत. त्या ठिकाणी आता नवीन फळा-फुलांची रोपे लावून परिसराचे सैंदर्य वाढविले जाणार आहे. जेसीबीच्या साहाय्याने परिसराचे सपाटीकरण करून स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचबरोबर परिसरात गटारी आणि काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. कार्यालयासमोर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आणि लहान बगीचा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विविध जंगली वनौषधी व फळा-फुलांच्या रोपांचा समावेश असणार आहे.

Advertisement

10 लाखातून विकास

कार्यालयाच्या समोर असलेली धोकादायक निलगिरीची झाडे हटविली आहेत. शिवाय सपाटीकरण केले जात आहे. या ठिकाणी विविध शोभिवंत झाडे लावली जाणार आहेत. त्याचबरोबर काँक्रीटचा रस्ता तयार केला जाणार आहे. 10 लाखाच्या निधीतून हे विकास काम होणार आहे.

- नागराज बाळेहोसूर.(एसीएफ, बेळगाव)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article