For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : निसर्ग, पर्यटन आणि अनुभव’ यांचा सुंदर संगम आता कास तलावावर अनुभवता येणार !

02:00 PM Oct 26, 2025 IST | NEETA POTDAR
satara   निसर्ग  पर्यटन आणि अनुभव’ यांचा सुंदर संगम आता कास तलावावर अनुभवता येणार
Advertisement

                    कास पठाराचं निसर्गसौंदर्य ,आता तलावात बोटिंगचा थरार

Advertisement

by इम्तियाज मुजावर

सातारा : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या कास पठाराला आता पर्यटनाचं आणखी एक नवं आकर्षण लाभलं आहे!कास पठारालगत असलेल्या कास तलावात सातारा नगरपालिकेच्या वतीने पॅडल बोट सेवा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ‘कास बोट क्लब’ ची स्थापना करण्यात आली आहे.

Advertisement

कास पठार पाहण्यासाठी येणारे अनेक पर्यटक आता तलावात नौका विहाराचाही आनंद घेऊ शकणार आहेत आज राज्याचे बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या कास बोटिंग क्लबचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनानंतर त्यांनी स्वतःही बोटिंगचा मनमुराद आनंद घेतला.

या बोटिंग सेवेमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, कास पठारासह कास तलाव हे दोन्ही ठिकाणे पर्यटकांसाठी नव्या अनुभवाचं केंद्र ठरणार आहेत. ‘निसर्ग, पर्यटन आणि अनुभव’ यांचा सुंदर संगम साताऱ्यात कास तलावावर अनुभवता येणार आहे!

“कास तलावाची शुद्धता कायम राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तलावात कोणतंही प्रदूषण होऊ नये, पाण्याचं नैसर्गिक संतुलन टिकून राहावं,
याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.” : नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Advertisement
Tags :

.