महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेय‘वादा‘ची लढाई! हा तर ‘दादांचा वादा‘

12:37 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आणि उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण‘ योजनेवरू आता महायुतीतच श्रेयवादाची लढाई सुरू होत आहे. या योजनातील ‘मुख्यमंत्री‘ या शब्दावरून योजनेचा बराचसा लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळतो. त्यामुळे आता वित्तमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकंडून अजित पवार यांना लाभदायक होईल अशा प्रकारे या योजनेच्या जाहिरातीचे फलक लावण्यात येत आहेत. त्यातून योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हा शब्द बाद करण्यात आला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत होणारी या योजनेची नोंदणी आता सप्टेंबरपर्यत वाढविण्यात आली आहे. एक कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र या योजनेला मिळण़ार्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या गोटात काळजीचे वातावरण असून त्यांच्या टीकेमुळे ही योजना अधिक प्रसिद्ध होत आहे. परिणामी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‘ या नावावरून योजनेचा फायदा केवळ मुख्यमंत्र्यांना मिळणार की काय अशी भीती महायुतीच्या घटक पक्षांनाही आहे. त्यामुळे आपल्या नेत्याचे नाव या योजनेच्या जाहिरातीत का नसावे आणि आपल्या पक्षाला या योजनेचा फायदा का मिळू नये, असा विचार करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मुख्यमंत्री शब्द वगळून तेथे उपमुख्यमंत्री असा शब्द वापरला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणली असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे महायुतीत या योजनेच्या श्रेयवादाची लढाई सुऊ झाल्याचे दिसत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या वेगवेगळ्या भागात मेळावे घेत आहेत. ते जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत ’अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना‘, ’दादाचा वादा‘, ’अजितदादांची लाडकी बहीण योजना‘, ’माझ्या अजितदादाने पैसे पाठवले‘, ’महिलांच्या बँक खात्यात येणारे 1500 ऊपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे.‘ ’महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे‘, असे संवाद ऐकायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या जाहिराती प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री हे सुऊवातीचे नाव काढून टाकले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, आपल्याकडे पेंद्र सरकारच्या अनेक योजना असतात. यापैकी बहुसंख्य योजनांना पंतप्रधानांचे नाव असते. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या योजनांच्या नावात मुख्यमंत्री असा उल्लेख असतो. मात्र, लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या व लोकांना समजण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही योजनेचे नाव लहान केले आहे, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही योजना मांडली होती. त्यामुळे त्यांना जर योजनेचे श्रेय घ्यायचे असते तर त्यांनी ही योजना उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावाने सादर केली असती. मात्र त्यांनी या योजनेला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले आहे. हे नाव अजित पवारांच्या विचारांनीच देण्यात आले आहे. अजित पवारांच्या मनात श्रेय घेण्याचा विचार असता तर कदाचित त्यांनी त्या योजनेला महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे किंवा स्वत:चे नाव दिले असते. परंतु, त्यांच्या मनात असा विचार आला नाही, असेही उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement
Next Article