For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli politics : पलूसमधील युतीचा चेंडू आता देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या कोर्टात

04:43 PM Nov 04, 2025 IST | NEETA POTDAR
sangli politics   पलूसमधील युतीचा चेंडू आता देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या कोर्टात
Advertisement

                            पलूस नगरपरिषदेवर बदलाचे राजकीय वारे

Advertisement

पलूस :  नगरपरिषदेच्या निवडणूकीचे वातावरण बदलाचे वारे घेत आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहे. युती करण्यासाठी नगराध्यक्ष पद व जागा बाटपाचा तिढा सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे.

दोन्ही पक्षातील स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत ६ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक युतीबाबत बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पलूस नगरपरिषदेवर कोणत्याही परिस्थिती सत्तातर घडवायाचे असा चंग बांधलेल्या भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुन्हा यु टर्न घेत पुन्हा बैठका सुरू केल्या आहेत. सुरूवातीला युती होणार नाही असे संकेत मिळत होते. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पलूस दौरा झाला. भाजपाचाच नगराध्यक्ष होणार असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे युती होणार नसल्याचे बोलले जात होते.

Advertisement

मात्र त्यानंतर राजकीय समिकरणे वेगाने फिरली. पुन्हा युतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपा यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची युतीबाबत ६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बैठक होणार असल्याचे समोर येत आहे. नगराध्यक्ष पद व आठ बारा सदस्यसंख्येचा अंदाज दिला जात आहे. याबाबत आधिकृत माहिती अजून सांगितली जात नसली तरी यावर प्रमुख राजकीय नेत्यांनी संमती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पलूस नगरपरिषदेवर सत्तांतर घडवायच असल्याने त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे. भाजपा व राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईत बोलावले असून त्यावेळी युती फायनल होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष उमेदवार सोडल्यास इतर इच्छुक जागांचे अर्ज मागवले आहेत. काँग्रेस पक्षातील प्रमुख मंडळींनी प्रभागवार बैठका सुरू केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.