For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक : मुख्यमंत्री

06:13 PM Jan 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक   मुख्यमंत्री
Bal Shastri Jambhekar Honor Scheme

सातारा : ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांसाठी असलेल्या बाळशांस्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक लावू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नायगाव तालुका खंडाळा येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळयावेळी महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती चे अध्यक्ष हरिश पाटणे,सदस्य चंद्रसेन जाधव यांनी पुणे विभागाच्या वतीने व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना या बाबत लेखी निवेदन दिले.त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.

Advertisement

सातारा पुणे सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजेनेचे प्रस्ताव परत येत असल्याने ,बराच काळ प्रलंबित राहत असल्याने पत्रकारांनी या बाबत पाटणे यांच्या कडे लक्ष घालण्याची मागणी केली होती.योजना असूनही
पात्र व गरजू पत्रकारांना लाभ मिळत नाही .पुणे विभागातील सातारा ,पुणे ,सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचे प्रस्ताव माघारी येत आहेत .ही बाब आज हरिश पाटणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.या विषयावर मंत्रालयात मुख्यमंत्री महोदय,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख ,किरण नाईक ,माहिती व जनसंपर्क विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी अशी स्वतंत्र बैठक लावावी अशी मागणी पाटणे यांनी केली.त्यावर लगेच च मुख्यमंत्री महोदयांनी अशी बैठक लवकर च लावू शी ग्वाही दिली.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.