For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनमोड घाटातील वाहतुकीवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे

10:19 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनमोड घाटातील वाहतुकीवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे
Advertisement

रात्रीच्या वाहतूक कोंडीसंदर्भात कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

Advertisement

वार्ताहर /रामनगर

गोवा-बेळगाव महामार्गावरील रामनगरपासून अनमोड घाटपर्यंत, रस्ताकाम करण्यासाठी व्यत्यय येऊ नये या दृष्टिकोनातून अवजड वाहनांना मात्र सायंकाळी सात ते पहाटे सातपर्यंत सोडण्याचा आदेश कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. परंतु सायंकाळी सात वाजता अनमोड तसेच मोलम येथून एकाचवेळी अवजड वाहनांना सोडत असल्याने अनमोड घाटात रात्रीच्या वेळी दररोज दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होत आहे. वाहनांच्या गर्दीमुळे छोटे मोठे अपघात होत असल्याने छोट्या वाहनांना तसेच लांब पल्ल्याच्या बसेसना तात्काळ घाटमाथ्यात अडकून बसावे लागत आहे. अनेकवेळा कारवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याने कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभाग तसेच महामार्ग रस्ते विभाग, तसेच तहसीलदार व इतर संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच अनमोड मार्गाची पाहणी करून आठ दिवसाच्या आत, अवजड वाहनांना 24 तास सोडण्याबाबत अहवाल देण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. तर अनमोड घाटात होणाऱ्या वाहतूक जामचा फटका येथे असणाऱ्या अबकारी विभागाला होत आहे. तर अनेकवेळा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने योग्यरीत्या गोवा येथून कर्नाटकात गोवा बनवटीची चोरटी वाहतूक करण्यात येत असलेली दारूही तपासणे मुश्किल होत आहे. तर अनमोड घाटमार्गातून छोटे वाहनधारक रात्री प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गातूनही आता लवकरच 24 तास अवजड वाहनांना सोडावे व रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सर्वांना मोकळे करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.