For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅथलेटॉन संघाकडे दोड्डण्णावर क्रिकेट चषक

06:02 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
अॅथलेटॉन संघाकडे  दोड्डण्णावर  क्रिकेट चषक
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णावर चषक लिटल चॅम्पस 12 वर्षांखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अॅथलेटॉन संघाने सीई पॉवर रंगरेज संघाचा 7 गड्यांनी पराभव करून राजू दो•ण्णावर चषक पटकाविला. श्लोक चढीचाल याला सामनावीर व मालिकावीराने गौरविण्यात आले.

भगवान महावीर मैदानावर घेण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात सीई पॉवर रंगरेज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 88 धावा केल्या. त्यात शिवनेज येळ्ळूरकरने 5 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. अॅथलेटॉन संघातर्फे श्रीजीत चोपडेने 3 तर श्लोकने 2 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना अॅथलेटॉन संघाने 13.5 षटकात 3 गडी बाद 89 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्याला श्लोकने 6 चौकारांसह 38 चेंडून नाबाद 42, गौरी जीने 10 धावा केल्या. रंगरेज संघातर्फे शिवकुमार दोडमनी, आयुष खाडे,सलमान धारवाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रमुख पाहुणे भरतेश स्कूलचे सचिव विनोद दोड्डण्णावर, संजू दोड्डण्णावर व प्रशांत रामगौडा यांच्या हस्ते विजेत्या अॅथलेटॉन व उपविजेत्या सीई पॉवर रंगरेज संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर श्लोक चढीचाल, उत्कृष्ट फलंदाज श्रेयस पाटील, उत्कृष्ट गोलंदाज सलमान धारवाडकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद अकादमीच्या सभासदांनी विशेष परिश्र घेतले.

Advertisement
Tags :

.