कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लष्कर करणार पिनाका रॉकेटची खरेदी

06:52 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

120 किमीपर्यंत मारक क्षमता : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली होती मोलाची भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय लष्कराने 120 किमी पर्यंतच्या रेंजसह गाईडेड पिनाका रॉकेट समाविष्ट करून आपली तोफखाना ताकद आणखी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या खरेदी व्यवहाराची अंदाजे किंमत अंदाजे 2,500 कोटी रुपये इतकी आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर लांब पल्ल्याच्या तोफखाना क्षमता मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण मंत्रालय स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या विकासाला विशेष प्राधान्य देत आहे.

पिनाका रॉकेट नवीन मार्गदर्शित रॉकेट संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे (डीआरडीओ) विकसित केली जातील. डीआरडीओने यापूर्वीच 120 किमी पल्ल्याच्या पिनाका रॉकेट आवृत्तीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता याच्या प्राथमिक चाचण्या लवकरच अपेक्षित आहेत. कदाचित येत्या आर्थिक वर्षात चाचण्या यशस्वी झाल्यानंतर त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर (डीएसी) मंजुरीसाठी ठेवला जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या व्यवहारावरून लष्कराचा या प्रणालीवरील पूर्ण विश्वास दिसून येतो.

विद्यमान लाँचर्सचे फायदे

सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे नवीन 120 किमी पल्ल्याच्या रॉकेट विद्यमान पिनाका लाँचर्सवरून डागता येतात. सध्या, हे लाँचर्स 40 किमी आणि 75 किमी पेक्षा जास्त रेंजचे रॉकेट डागू शकतात. यामुळे लष्कराला नवीन लाँचर्स खरेदी करण्याची गरज भासणार नसल्यामुळे खर्चात बचत होईल आणि जलद अपग्रेड शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.

पिनाका प्रणाली ही एक मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर असून ती 44 सेकंदात 12 रॉकेट डागू शकते. ती त्याच्या जलद प्रतिसाद, अचूकता आणि क्षेत्राला मोठे नुकसान पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. पिनाका ही स्वदेशी शस्त्रांच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे. एकदा लांब पल्ल्याच्या पिनाका तयार झाल्यानंतर लष्कर इतर पर्यायी शस्त्रांच्या योजना सोडून देईल, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article