महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साखळीत जलवाहिनी पुन्हा फुटली

12:03 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कामगार वर्गाचे दुर्लक्ष असल्याने हजारो लिटर पाणी वाया

Advertisement

साखळी : साखळी शहरात सरकार उच्च माध्यमिक विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जंक्शनवर गेल्या काही दिवसांपूर्वी फुटलेल्या व नंतर दुरूस्त करण्यात आलेल्या जलवाहिनीला पुन्हा गळती लगली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या गळती लागलेल्या जलवाहिनीतून रस्त्यावर व गटरात राजरोसपणे पाणी वाहत आहे. दरम्यान कुठेही जलवाहिनी फुटून पाणी वाहत असल्यास त्याची तक्रार आल्यावरच पाणी पुरवठा विभागाकडून दुरूस्ती करण्यात येते. डोळ्यादेखत पाणी वाहताना दिसूनही त्याची दुरूस्ती करण्याची तसदी हे खाते किंवा पाणी पुरवठा विभागाचे अभियंते व कामाला असलेले प्ल?बरही घेत नाही. तर तक्रार आल्यानंतरच गळक्मया जलवाहिन्या दुरूस्त केल्या जातात. याबाबत खुद्द एका प्ल?बरनेच सदर उच्च माध्यमिक हायस्कुलजवळील गळक्मया जलवाहिनीची दुरूस्ती करताना एका पत्रकारासमोर उर्मटपणे बोलताना कबुली दिली होती. साखळी बसस्थानक, बाजार व इतर ठिकाणी जाणाऱ्या तसेच उच्च माध्यमिक हायस्कुलजवळ जाणाऱ्या रस्त्याच्या जंक्शनवर कोपऱ्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी जलवाहिनी फुटली होती. दिवसरात्र मोठ्या प्रमाणात पाणी भररस्त्यात वाहून वाया जात होते. परंतु त्याची पाणी पुरवठा विभागाने स्वेच्छा दखल घेतली नव्हती. नगरपालिका व स्थानिक नगरसेवक आनंद काणेकर यांनी तक्रार केल्यानंतर सदर जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली होती.

Advertisement

प्ल?बर्सचा उर्मटपणा, तक्रारीशिवाय दुरूस्ती नाही !

सदर जलवाहिनी दुरूस्त करतेवेळी काम करणाऱ्या कंत्राटी पध्दतीवरील प्ल?बरनी उर्मटपणे बोलताना जलवाहिनी फुटून वाहत असल्यास तक्रार द्यायला हवी. फोटो काढून काहीही होत नाही. तक्रार आल्यानंतरच त्यांची दुरूस्ती होते. असे म्हटले होते. यावरून पाण्यासारखा संवेदनशील घटक जरी रस्त्यावर वाहून जात असला तरी त्याची स्वेच्छा दखल घेतली जात नाही, हेच सिध्द होते.

जलवाहिनी पुन्हा फुटल्याने कामाच्या दर्जावर प्रŽचिन्ह

सदर जलवाहिनी त्याच ठिकाणी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यानंतर ती दुरूस्त करण्यात आली होती. परंतु मागील दिड महिन्याच्या काळात ती पुन्हा फूटली असल्याने ती दुरूस्त केलेल्या प्ल?बर्सनी केलेल्या कामावर प्रŽचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी (दि. 24) सदर जलवाहिनीला गळती लागलेल्या अवस्थेत ती वाहत आहे. सध्या त्यातून जास्त प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या पादचारी व इतरांना सध्या याच पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच रस्त्यावरून भरधावपणे जाणाऱ्या वाहनांमुळे ते लोकांच्या अंगावरही शिंपडते. आतातरी या जलवाहिनीची योग्य पध्दतीने व योग्य प्ल?बर्सकडून दुरूस्ती करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पक्षी, जनावरांना सरकारी मोफत पाण्याची सोय ?

सांखळी मतदारसंघातील काही भागात पाईप गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे काही संबंधित अधिकारी व कामगाराच्या मनमानी कारभार आणि दुर्लक्ष होत असल्याने सरकारचे पाणी पक्षी, जनावरांना मोफत उपलब्ध होत आहे ही चांगली गोष्ट असलीं तरी पाण्याची नाशाडी थांबवणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article