For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅपल कंपनीचा इव्हेंट होणार 7 मे रोजी

06:26 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅपल कंपनीचा इव्हेंट होणार 7 मे रोजी
Advertisement

आयपॅडसह इतर उत्पादने करणार लाँच

Advertisement

पॅलिफोर्निया :

आयफोन निर्माती कंपनी अॅपल यांनी 7 मे रोजी आपला खास लाँच कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. सदरचा लाइव्ह कार्यक्रम 7 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे अशी माहिती अॅपलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Advertisement

या कार्यक्रमामध्ये कंपनी आयपॅडचे लॉन्चिंग करणार आहे. या व्यतिरिक्त इतरही उत्पादने सादर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनी या कार्यक्रमांतर्गत आयपॅड प्रो सादर करणार असून 13 इंचाचा ओएलइडी डिस्प्ले यात दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे एम थ्री चिपची सुद्धा जोडणी यामध्ये असेल. यासोबतच अॅपल पेन्सिल आणि मॅजिक कीबोर्ड यांचेसुद्धा सादरीकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या कल्पक वैशिष्ट्यांसह आणि नव्या डिझाईन सह आयपॅडचे सादरीकरण होणार असल्याचे अॅपलच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :

.