For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओप्पो के 12 एक्स 29 रोजी बाजारात येणार

06:21 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओप्पो के 12 एक्स 29 रोजी बाजारात येणार
Advertisement

6.67 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, 50 एमपीचा कॅमेरा : 5,100 एमएएच क्षमतेची बॅटरी : किंमत 25000 पर्यंत

Advertisement

नवी दिल्ली :

टेक कंपनी ओप्पो आपला नवीन बजेटमध्ये प्राप्त होणारा स्मार्टफोन ‘ओप्पो के12एक्स 5-जी’ या महिन्यात 29 जुलै रोजी भारतीय बाजारात सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सादर केलेल्या तारखेच्या आधारे सांगितले आहे.

Advertisement

ओप्पो के 12 एक्स 5 जी स्मार्टफोनमध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.67 इंच आकारचा डिस्प्ले, व्हीओओसी चार्जिंग सपोर्टसह 5,100 एमएएच बॅटरी व 50 एमपी क्षमतेच्या कॅमेऱ्यासोबत सादर होणार असल्याची माहिती आहे. यासह मीडियाटेक डायमेंशन 7200 चिपसेट मिळण्याचीही अपेक्षा अधिक आहे.

सदरचा स्मार्टफोन हा दोन कलरमध्ये प्राप्त होणार असल्याची अपेक्षा असून उपलब्ध टीझरनुसार सुरुवातीची किंमत ही 25,000 रुपये राहणार असल्याची शक्यता अधिक आहे.

Advertisement
Tags :

.