For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांना फसवल्याचा आरोप बिनबुडाचा

10:57 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिलांना फसवल्याचा आरोप बिनबुडाचा
Advertisement

समर्थनगरच्या महिलेचे पोलीस आयुक्तांकडे स्पष्टीकरण

Advertisement

बेळगाव : कर्ज मिळवून देण्याचे सांगून महिलांना लाखो रुपयांना फसवल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे संबंधित महिलेने पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासंबंधी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन आपण निर्दोष असल्याचे सांगितले आहे. समर्थनगर येथील भाग्यश्री हुबळीकर या महिलेने निवेदन दिले आहे. 6 सप्टेंबर रोजी काही महिलांनी भाग्यश्री यांच्या विरोधात मार्केट पोलिसांकडे तक्रार करून कर्ज व सबसिडी मिळवून देण्याचे सांगून भाग्यश्री यांनी फसवल्याचा आरोप केला होता. आता भाग्यश्री यांनी यावर खुलासा केला आहे. आपली चूक झाकण्यासाठी काही जणांनी माझ्यावर आरोप केला आहे. खोटी तक्रार देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना मानसिक त्रास झाला आहे. आपल्याला धमक्याही दिल्या जात आहेत. या प्रकरणाची चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही भाग्यश्री यांनी निवेदनात केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.