For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तिपीठ महामार्गाची आखणी बदलणार

06:35 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
शक्तिपीठ महामार्गाची आखणी बदलणार
Advertisement

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत माहिती

Advertisement

नागपूर :

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाला  विरोध होत असतानाच राज्य सरकारने या मार्गाची आखणी बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. सोलापूर पासून आपली रस्त्यांची आखणी ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर जात होती, आणि त्याच्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्ग का बनवतो कारण यामुळे नवीन एरिया ओपन होतात, ग्रीन फील्ड महामार्गामुळे न जोडले गेलेले लोक त्याला जोडले जातात आणि तिथे विकास होतो. म्हणून जयकुमार गोरे आणि सर्वांनी यावर चर्चा केली आणि याची सोलापूरपासून एक वेगळी नवीन आखणी आम्ही तयार केली असून सोलापूर ते चंदगड अशी नवीन आखणी  करत नवा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, नागपूर गोवा द्रुतगति मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे त्याचं नाव जरी नागपूर गोवा असले तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे, मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल, आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेप लोकांचे आले होते, विशेषता लोकांचा एक आक्षेप होता तो खरा होता की, आपण जी अलाइनमेंट फॉलो केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली.

राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम

शक्तिपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरणार आहे. मात्र, धाराशीवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवीन आखणी करत सोलापूर आणि सांगली जिह्यांमधून नेण्यात येईल, ज्यामुळे या दोन्ही जिह्यांचा शक्तिपीठाशी थेट संपर्क प्रस्थापित होईल, असे फडणवीसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.