प्रत्येक देशात दोनवेळा फिरण्याची किमया
एका व्यक्तीने वयाच्या 48 व्या वर्षात जगातील प्रत्येक देशाचा प्रवास दोनवेळा पूर्ण केला आहे. या यात्रेत युद्धाने प्रभावित देशांपासून जगातील सर्वात रहस्यमय देश उत्तर कोरिया देखील सामील आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारा आपण एकमेव असल्याचा दावा नॉर्वेच्या ओस्लो येथील रहिवासी गुन्नार यांनी केला आहे. गुन्नार आता अंटार्क्टिका येथे जाणार आहेत. अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर लोकांसोबत स्वत:च्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. कशाप्रकारे जगातील सर्वात निर्जन बेटावर दिवस व्यतित केले, बोत्सवानात सिंह पाहिला हे त्यांनी सांगितले आहे.
गुन्नार यांनी या अनोख्या विक्रमी कामगिरीसाठी प्रारंभी पैसे जमविले, गुन्नार हे एक ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट आहेत. 2008-13 पर्यंत त्यांनी नोकरी करत त्यातून जमविलेल्या पैशांमधून जगातील अनेक देशांचे भ्रमण केले. परंतु हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:चे कौटुंबिक आयुष्य, कार आणि आरामदायी घर सोडावे लागले. यानंतर ते जगातील प्रत्येक देशात पोहोचून तेथील जीवनाचा अनुभव घेत राहिले. गुन्नार यांच्यानुसार युद्ध प्रभावित देशांपेक्षाही अधिक धोकादायक उत्तर कोरिया हा देश होता. तेथे नेहमीच एखाद्या तुघलकी नियमाचे उल्लंघन होण्याची भीती सतावत रहायची असे त्यांचे सांगणे आहे.
2018 मध्ये गुन्नार यांनी प्रत्येक देशाचा प्रवास केला होता. परंतु या विक्रमी कामगिरीवर समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा जगभ्रमंतीचा प्लॅन आखला. जगातील प्रत्येक देशात दुसऱ्यांदा पोहोचणारा मी एकमेव व्यक्ती आहे. यादरम्यान युद्धप्रभावित देशांमध्ये मी धोक्यांना सामोरा गेला आहे. या विक्रमी कामगिरीसाठी स्वत:च्या जॉबमधील सुट्या आणि दीर्घ वीकेंड्सचा वापर केला. रविवारी मी अनेकदा अन्य देशात असायचो आणि सोमवारी स्वत:च्या ऑफिसमध्ये हजर रहायचो असे गुन्नार यांनी सांगितले आहे. त्यांची कहाणी जाणून घेतल्यावर अनेक जण त्यांच्याप्रमाणेच जॉब करत जगभ्रमंती करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.