संघ राष्ट्रीय संस्कृतीचा ‘अक्षय वटवृक्ष’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : संघभूमी, दीक्षाभूमीला भेट
प्रतिनिधी/ नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगणा येथील माधव नेत्रालयाचे भूमिपूजन आज झाले. यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माधव नेत्रालयाचे अविनाश अग्निहोत्री आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वी हेडगेवार आणि गुऊजींनी ही राष्ट्रीय चेतना वाढविली. शंभर वर्षे पूर्वी जे वटवफक्ष निर्माण झाले होते, ते आज विशाल स्वरूपात सर्वांसमोर आहे. आदर्श आणि सिद्धांतामुळे हे वटवफक्ष टिकले, असे गौरवाद्गार त्यांनी काढले.
बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होत आहे. त्याला निरंतर गतिमान ठेवते. त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे. द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुऊजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.
स्वंयसेवक अनुशासित सैनिकासारखे, सेवा भावनेतून काम करतात
आपण पाहतो, डोंगराळ क्षेत्र असो, सागरी क्षेत्र असो, वनक्षेत्र असो, संघाचे स्वयंसेवक त्यांचे काम करत असतात. प्रयागराजमध्ये आपण पाहिले स्वयंसेवकांनी कशा पद्धतीने लाखो लोकांची मदत केली. जिथे सेवा कार्य तिथे स्वंयसेवक. नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर कुठलेही संकट असो, स्वंयसेवक अनुशासित सैनिकासारखं तिथे पोहोचतात आणि सेवा भावनेतून काम करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असते. आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही. कारण ही चेतना जागफत ठेवणारे अनेक आंदोलन देशात होत राहिले आहे. भक्ती आंदोलन त्याचचं एक उदाहरण आहे. आमच्या संतांनी समाजात ती चेतना निर्माण केली. महाराष्ट्रातील शेकडो संतांनी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी हे काम केलंय. तर पुढे विवेकानंद यांनी हे काम सुरू ठेवलं. यावेळी सरसंघचालक डॉ मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही भाषण झाले.
‘माधव नेत्रालयाविषयी..
द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मफतीप्रित्यर्थ नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना 1995 मध्ये झाली. वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय सिटी सेंटर 2018 पासून सेवेत आहे. या नेत्र चिकित्सालयातून आधुनिक तंत्रज्ञानाने गरीब ऊग्णांवर कमी खर्चात उपचार होतात.
सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन
नागपूर - अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिपेंस अॅन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुपद्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संघभूमी, दीक्षाभूमीला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मफती मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुऊजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच संघ स्मफती मंदिराला भेट दिली आहे. संघ शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व आणखी वाढले.
संघ प्रक्रियेत वर्ष प्रतिपदेला फार महत्त्व असते. तिथीनुसार डॉ. हेडगेवार यांची जयंतीदेखील असते. या दिवशी मोदींची संघस्थानी भेट झाल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळाच्या नजरा रेशीमबागकडे लागल्या होत्या. सरसंघचालक मोहन भागवत, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी तसेच संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते.
मोदी यांनी या परिसराची पाहणी केली व संघ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शनदेखील घेतले. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, डॉ राजेंद्र गवई आदी उपस्थित होते. मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मफती मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व इतर.