3,300 प्रतिटन ऊस दरासह आंदोलन समाप्त
अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश : सरकारच्या मध्यस्थीतून निघाला तोडगा
चिकोडी : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले ऊस दरासाठीचे आंदोलन शुक्रवारी सरकारच्या मध्यस्थीने प्रतिटन उसास 3300 घोषणेसह संपले. सरकारच्या चर्चेतून तोडगा निघाल्याने शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतल्याचे घोषित करत आनंदोत्सव साजरा केला. निपाणी-मुधोळ रस्त्यावर गुर्लापूर फाट्यावर गेल्या नऊ दिवसांपासून दिवसरात्र आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील विविध जिह्यांतून पाठिंबा मिळत होता. त्यानुसार आंदोलक शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली होती. दरम्यान संध्याकाळी शेतकरी संघटनेला सरकारचा निर्णय मान्य झाल्यावर शेतकऱ्यांनी गुर्लापूर क्रॉसवर जल्लोष केला.
शेतकरी संघटनेचा विजय असो, जय जवान जय किसान अशा घोषणा देत हिरवे टॉवेल उधळून शेतकऱ्यांनी जल्लोष केला. यंदा 3200 रुपयांवर दर देता येत नसल्याचे कारखानदारांनी म्हटले होते. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. अखेर नऊ दिवसांनी आंदोलन पूर्ण झाले. राज्य रयत संघटनेचे गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगी व चुनाप्पा पुजारी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सर्व शेतकऱ्यांचे मत जाणून हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. रयत संघटनेच्या नेत्यांना खांद्यावर घेऊन शेतकऱ्यांनी जल्लोष केला.
शेतक्रयांनी केलेल्या आंदोलनाची दखल सरकार व कारखानदारांना घ्यावी लागली. राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व आम्ही दोघेही शेतक्रयांशी घट्ट राहिलो अनेकप्रकारे आमच्यात फुट पाडण्याचे प्रयत्न केले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी चांगली मदत केली. त्यांच्या बदलीचेही प्रयत्न सुरू होते. एक रूपयाही देणार नसल्याचे म्हणणारे कारखानदार आता शेतक्रयांसमोर नमले आहेत. 3250 कारखानदार व 50 रूपये सरकार देणार आहे. त्यामुळे हा शेतक्रयांचा विजय आहे. शेतकरी एक असल्यावर काहीही होऊ शकते हे दाखवून दिले आहे. हत्तरगीजवळ झालेली दगडफेक ही शेतक्रयांनी केलेली नाही. ती काही समाजकंटकांकरवी करून आंदोलन बिघडविण्याचा प्रयत्न केला असल्याचेर यत संघटनेचे राज्य गौरवाध्यक्ष शशीकांत पडसलगी यांनी सांगितले.