महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द. आफ्रिकेची कसोटीवर मजबूत पकड

06:12 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पोर्ट ऑफ स्पेन

Advertisement

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात खेळाच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा आला. दरम्यान या कसोटीत द. आफ्रिकेने आपली स्थिती मजबूत केली आहे. द. आफ्रिकेचा पहिला डाव 357 धावांवर आटोपाल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 4 बाद 145 धावा जमविल्या. द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने विंडीजचे 3 फलंदाज झटपट बाद केले.

Advertisement

या पहिल्या कसोटीत द. आफ्रिकेचा पहिला डाव 117.4 षटकात 357 धावांत आटोपला. द. आफ्रिकेने 8 बाद 344 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी 13 धावांची भर घालत तंबूत परतले. द. आफ्रिकेच्या डावामध्ये टोनी डी झोर्जी आणि कर्णधार बहुमा यांनी शानदार अर्धशतके झळकविली. झोर्जीने 2 षटकार आणि 7 चौकारांसह 78 तर बहुमाने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 86 धावा जमविल्या. व्हेरेनीने 5 चौकारांसह 39, मुल्डेरने 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 41, स्टब्जने 2 चौकारांसह 20, बेडींगहॅमने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29, रिक्लेटोनने 2 चौकारांसह 19 तर रबाडाने 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. विंडीजतर्फे वेरीकेनने 69 धावांत 4, सिलेसने 67 धावांत 3, रॉचने 53 धावांत 2, तर होल्डरने 39 धावांत 1 गडी बाद केला.

कर्णधार ब्रेथवेट आणि लुईस यांनी विंडीजच्या डावाला सावध सुरूवात करुन देताना 53 धावांची भागिदारी केली. लुईसने 5 चौकारांसह 35 तर ब्रेथव्हेटने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 35 धावा जमविल्या. केशव महाराजने लुईसचा त्रिफळा उडविला. त्यानंतर ब्रेथव्हेट चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. यावेळी विंडीजची स्थिती 2 बाद 114 होती. दरम्यान केशव महाराजने विंडीजला पाठोपाठ दोन धक्के दिले. केशव महाराजने कार्टीला पायचित केले. त्याने 5 चौकारांसह 42 धावा जमविल्या. केशव महाराजच्या गोलंदाजीवर अथांजे 3 धावांवर झेलबाद झाला. हॉज 11 तर होल्डर 13 धावांवर दिवसअखेर खेळत होते. विंडीजचा संघ अद्याप 212 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत. पावसामुळे सुमारे दीड तासांचा खेळ वाया गेला.विंडीजची एकवेळी स्थिती 1 बाद 114 अशी होती. त्यानंतर केशव महाराजच्या फिरकीसमोर त्यांची स्थिती 4 बाद 124 अशी झाली. विंडीज संघाला अलिकडेच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका एकतर्फी गमवावी लागली होती. आता द. आफ्रिकेबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक: द.आफ्रिका प. डाव 117.4 षटकात सर्व बाद 357 (झोर्जी 78, बहुमा 86, मुल्डेर नाबाद 41, व्हेरेनी 39, बेडिंगहॅम 29, स्टब्ज 20, रिक्लेटोन 19, रबाडा 21, अवांतर 15, वेरीकेन 4-69, सिलेस 3-67, रॉच 2-53, होल्डर 1-39), विंडीज प. डाव 67 षटकात 4 बाद 145 (ब्रेथवेट 35, लुईस 35, कार्टी 42, हॉज खेळत आहे 11, होल्डर खेळत आहे 13, अवांतर 6, केशव महाराज 3-45).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article