For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द. आफ्रिकेला 239 धावांची आघाडी

06:58 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
द  आफ्रिकेला 239 धावांची आघाडी
Advertisement

मारक्रेम, व्हेरेनी यांची अर्धशतके, जोसेफचे पाच बळी

Advertisement

वृत्तसंस्था/गयाना

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर द. आफ्रिकेने आपली स्थिती अधिक मजबूत करताना यजमान विंडीजवर 239 धावांची भक्कम आघाडी मिळविली. दिवस अखेर द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात 5 बाद 223 धावा जमविल्या. मारक्रेम आणि व्हेरेनी यांनी शानदार अर्धशतके झळकविली. तर मुल्डेर आणि बर्गर यांनी विंडीजच्या पहिल्या डावात प्रभावी गोलंदाजी केली.

Advertisement

या दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेचा पहिला डाव 160 धावांत विंडीजने गुंडाळला. विंडीजच्या शमार जोसेफने 33 धावांत 5 तर सिलेसने 45 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्यासमोर विंडीजलाही 150 धावांचा टप्पा गाठू दिला नाही. विंडीजने 7 बाद 97 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे तीन गडी 47 धावांची भर घालत तंबूत परतले. विंडीजच्या पहिल्या डावात होल्डरने शेवटपर्यंत एकाकी लढत देत 88 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 54 धावा जमविल्या. शमार जोसेफने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25 तर मोतीने 1 चौकारासह 11 आणि कार्टिने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. विंडीजचा पहिला डाव 42.4 षटकात 144 धावांत आटोपल्याने द. आफ्रिकेने नाममात्र 16 धावांची आघाडी मिळविली. मुल्डेरने 32 धावांत 4, बर्गरने 49 धावांत 3 तर केशव महाराजने 8 धावांत 2 गडी बाद केले.

16 धावांनी आघाडी मिळविलेल्या द. आफ्रेकेने दुसऱ्या डावाला सावध सुरुवात केली. मारक्रेम आणि झॉर्जी यांनी सलामीच्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. झॉर्जीने 5 चौकारांसह 39 तर मारक्रेमने 108 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा जमविल्या. मारक्रेम आणि स्टब्ज यांनी दुसऱ्या गड्यासाठी 41 धावांची भर घातली. स्टब्जने 1 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कर्णधार बहुमा आणि बेडींग हॅम हे दोन फलंदाज लवकर बाद झाल्याने द. आफ्रिकेची स्थिती 5 बाद 139 अशी झाली होती. त्यानंतर व्हेरेनी आणि मुल्डेर यांनी संघाचा डाव सावरताना दिवस अखेर सहाव्या गड्यासाठी  84 धावांची अभेद्य भागिदारी केली. व्हेरेनी 7 चौकारांसह 50 तर मुल्डेर 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहे. विंडीजतर्फे सिलेसने 52 धावांत 3 तर मोतीने 61 धावांत 2 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून द. आफ्रिकेचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 54 षटकात सर्व बाद 160, विंडीज प. डाव 42.4 षटकात सर्व बाद 144 (होल्डर नाबाद 54, कार्टि 26, शमार जोसेफ 25, मुल्डेर 4-32, बर्गर 3-49, केशव महाराज 2-8, रबाडा 1-40), द. आफ्रिका दु. डाव 70 षटकात 5 बाद 223 (झोर्जी 39, मारक्रेम 51, स्टब्ज 24, व्हेरेनी खेळत आहे 50, मुल्डेर खेळत आहे 34, अवांतर 21, सिलेस 3-52, मोती 2-61)

Advertisement
Tags :

.