बाथटबमध्ये पडून राहण्याचे काम
दिवसाला 35 मिनिटे काम करावे लागणार
शिक्षण घेत चांगली नोकरी मिळविणे आता सोपे राहिलेले नाही. अनेक जणांना नोकऱ्यांमध्ये हवा तितका पगार मिळत नसतो. परंतु काही कामांकरता कमी श्रमात चांगला पगार मिळत असतो. परंतु यात काही खास कौशल्याची गरज असते ही बाब वेगळी. एका नोकरीत केवळ 35 मिनिटांसाठी हजारो रुपये मिळणार आहेत.
सध्या बाथरुम क्वालिटी एश्योरेन्स टेस्टरची नोकरी निघाली असून यात आठवड्यात केवळ 1-4 तास काम करावे लागते. यात फ्रीलांसिंगची सुविधा देखील आहे. या कामाकरता चांगला पगार दिला जात आहे.
बाथरुम डील नावाच्या कंपनीकडून हा जॉब दिला जात आहे. यात बाथरूममधूनच नोकरी करावी लागणार आहे. तुम्हाला बाथटबमध्ये कंपनीच्या बजेट प्रेंडली प्रॉडक्ट्स वापरावे लागतील आणि याचा फीडबॅक द्यावा लागणार आहे. बाथरुम क्वालिटी एश्योरेंस टेस्टरच्या फीडबॅकद्वारे कंपनीला स्वत:च्या ग्राहकांना अधिक विश्वासाने उत्पादने पुरविता येणार नसल्याचे कंपनीच्या बाथरुम तज्ञ वॉरेन किनलोच यांचे सांगणे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. कंपनीच्या वेबसाइटवर असलेल्या अर्जावरील काही प्रश्नांची उत्तरे देत अर्ज करता येणार आहे. नोकरी स्वत:च्या घरातूनच करावी लागणार असली तरीही महिन्यातून एकदा कंपनीचे तज्ञ तुमच्या स्नानासाठी वापरली जाणारी सामग्री बदलणार आहेत. संबंधिताला या कामासाठी महिन्याला 40 हजार रुपये दिले जाणार आहेत. याकरता आठवड्यात1-4 तास म्हणजे प्रतिदिन 35 मिनिटे स्नान करावे लागणार आहे. यादरम्यान संबंधित व्यक्ती टीव्हीही पाहू शकतो आणि मनपसंतीचे कामही करू शकतो.