For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 जूनला झळकणार ‘द एकोलाइट’

06:07 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
4 जूनला झळकणार ‘द एकोलाइट’
Advertisement

ओटीटीवर होणार सीरिज प्रदर्शित

Advertisement

चालू वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित वेबसीरिजपैकी एक ‘स्टार वॉर्स : द एकोलाइट’चा नवा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन पहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये एमी-विजेता स्क्विड गेम अभिनेता ली जंग-जे, अमांडला स्टेनबर्ग आणि द मॅट्रिक्स स्टार कॅरी-ऐनी मॉस दिसून येणार आहे.

‘स्टार वॉर्स : द एकोलाइट’च्या ट्रेलरमध्ये द हाय रिपब्लिक युगादरम्यान सिथ कसे प्रतीत होते हे दिसून येते. ट्रेलरमध्ये अॅक्शनचा फूल डोस दाखविण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते स्वत:च्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या आगामी सीरिजमध्ये चार्ली बार्नेट, मॅनी जैसिंटो, डीन-चार्ल्स चॅपमॅन, जूनास सुओटामो, डॅफने कीन, जोडी टर्नर-स्मिथ आणि रेबेका हेंडरसन हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत.  तर स्टार वॉर्स : द एकोलाइट ही सीरिज 4 जून रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा प्रीमियर डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.