For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज-डीकेच्या सीरिजमध्ये समांथा

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज डीकेच्या सीरिजमध्ये समांथा
Advertisement

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर लवकरच राज आणि डीके यांच्या पुढील वेबसीरिजमध्ये दिसून येऊ शकतो. या वेबसीरिजचे नाव ‘रक्तबीज’ ठेवण्यात आले आहे. यासाठी आदित्यला ऑफर मिळाली आहे. या अॅक्शन सीरिजमध्ये आदित्यसोबत समांथा रुथ प्रभू देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. द नाइट मॅनेजरनंतर आदित्यचा हा ओटीटीसाठी दुसरा प्रोजेक्ट असेल.

Advertisement

आदित्यने मे महिन्यातच या सीरिजसाठी होकार दर्शविला आहे. यानंतर निर्मात्यांनी समांथाला यात सामील केले आहे. दोन्ही कलाकारांनी सीरिजसाठी स्वत:ची तयारी देखील सुरू केले आहे. लवकरच या दोघेही या अॅक्शन सीरिजसाठी एकत्र प्रशिक्षण घेणार आहेत. राज आणि डीके ही जोडी सध्या फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनचे चित्रिकरण करत आहे. यानंतर ही जोडी पुढील वर्षापर्यंत नवी सीरिज प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.

राज आणि डीकेच्या पॅमिली मॅनमध्ये समांथा रुथ प्रभू दिसून आली होती. यानंतर ती आता अभिनेता वरुण धवनसोबत ‘सिटाडेल : हनी बनी’मध्ये देखील मुख्य भूमिकेत असेल. या सीरिजला एक हेरगिरीवर आधारित अॅक्शन थ्रिलरसोबत प्रेमकहाणीमध्ये गुंफण्यात आले आहे. ही सीरिज 90 च्या दशकातील टेपेस्ट्रीवर आधारित आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.