For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जे आमच्या हक्काचे ते प्राप्त झाले पाहिजे : अर्चना घारे- परब

05:47 PM Oct 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जे आमच्या हक्काचे ते प्राप्त झाले पाहिजे   अर्चना घारे  परब
Advertisement

जाणीव जागर यात्रेला महिला, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यात सुरुवात झाली आहे.महिला, युवक ,जेष्ठ नागरिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद यात्रेला मिळत आहे.आमच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याच काम गेली अनेक वर्षे झालेल आहे. त्यामुळे आमच्या जे हक्काचे आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी जाणीव जागर यात्रेवेळी मार्गदर्शन करताना केले.तालुक्यातीलआंबेगाव,कुणकेरी,कोलगाव,तळवडे न्हावेली,निरवडे,सोनुर्ली,वेत्ये,मळगाव या गावांमध्ये सौ.घारे यांची जाणीव जागर यात्रा पोहोचली.या गावांमध्ये महिला युवक ज्येष्ठांकडून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य,रोजगार,रस्ते,पूल याबाबत व्यथा मांडल्या.महिला वर्गानेदेखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.यावेळी महिलांनी आपल्या समस्यांचा पाढा सौ.घारे यांच्यासमोर यात्रेदरम्यान वाचला.यावेळी सौ.घारे यांनी उपस्थितांना मूलभूत हक्कांची जाणीव करुन दिली.असंख्य समस्या आपल्यापुढे आहेत.आपल्याला हक्काच्या या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे.हे सगळे आपले मूलभूत हक्क असून हक्काच आहे ते प्राप्त झालेच पाहिजे डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही आपल्याला दिलेली शक्ती असून त्यात मोठी ताकद आहे.त्या शक्तीची त्या ताकदीची जाण ठेवा,ती ताकद स्मरणात ठेवा तुमच्या हक्काच तुम्हाला प्राप्त करुन देणे हाच आपला उद्देश आहे.असे प्रतिपादन सौ.अर्चना घारे परब यांनी यावेळी केले.याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री प्रविण भोसले,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक,महिला शहराध्यक्ष ॲंड.सौ.सायली दुभाषी,कोकण विभाग सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटकर,सोशल मीडिया सिंधुदुर्ग प्रमुख संजय भाईप,युवती जिल्हाध्यक्ष सौ.सावली पाटकर,विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस,विधानसभा युवती अध्यक्ष सौ.सुनिता भाईप,युवती तालुकाध्यक्ष सौ.सुधा सावंत,विद्यार्थी अध्यक्ष कु.ह्रतिक परब,जुहुर खान,याकूब शेख,सिद्धेश तेंडोलकर,बावतीस फर्नांडिस,साईनाथ तानावडे,संजय तानावडे,राजन परब,नामदेव परब,आनंद गावडे,साईनाथ गावडे,तेजस गावकर,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेला उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.