कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑडिओतील ‘तो आवाज माझाच’

11:17 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संचालक दशरथ रेडकर यांनी केले स्पष्ट

Advertisement

पणजी : गत काही दिवसांपासून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओवरून राज्यभरात खळबळ माजलेली असली तरीही मंत्र्यांत्री मात्र हा सर्व बेबनाव असल्याचे म्हटले आहे. तसेच सदर ऑडिओ आणि करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, ते सर्व आरोप खोटे, निराधार, बिनबुडाचे असल्याचे त्यांनी पत्रकारांसमोर बोलताना स्पष्ट केले आहे. दुसऱ्या बाजूने सदर ऑडिओत ज्या संचालकांशी मंत्री अर्वाच्च भाषेत बोलतात, ते दशरथ रेडकर यांना सायंकाळी पत्रकारांनी गाठले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र जाता जाता दबक्या आवाजात ’तो आवाज’ आपलाच असल्याचे मान्य केले. दरम्यान, या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना सभापती रमेश तवडकर यांनी, लोकसेवकांनी सार्वजनिक जीवनात वावरताना नैतिकता जपली पाहिजे, त्यासाठी सदैव जागृत राहिले पाहिजे, असे म्हटले होते. प्रियोळ मतदारसंघात आयोजित करण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमावरून मंत्री गावडे यांनी संचालक रेडकार यांना फोन करून चांगलेच फैलावर घेतल्याचे संभाषण ऑडिओत आहे.

Advertisement

मंत्र्यांनी संचालकांची माफी मागावी : लोबो

मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधीनी अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे आहे. यातून तुम्ही इतरांना खास करून शालेय विद्यार्थ्यांना चुकीची शिकवण देतात. मंत्री गोविंद गावडे यांनी संबधित संचालकांची माफी मागितली पाहिजे. याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अवश्य दखल घेतील, अशी प्रतिक्रिया कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगूट येथे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. अधिकाऱ्याला अपशब्द वापरणे चुकीचे आहे. शिवीगाळ, धमकी देणे मंत्र्यांना शोभत नाही. त्यांनी त्वरित संचालक दशरथ रेडकर यांची माफी मागावी. व्हायरल ऑडिओनुसार अधिकाऱ्यांना धमकावण्याची मंत्र्यांची भाषा निषेधार्ह असल्याचेही आमदार लोबो म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article