For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थरूर यांच्या माजी पीएला सोने तस्करीप्रकरणी अटक

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
थरूर यांच्या माजी पीएला सोने तस्करीप्रकरणी अटक
Advertisement

दिल्ली विमानतळावर कारवाई, साथीदारही जाळ्यात

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे माजी स्वीय साहाय्यक शिवकुमार याला सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई  करण्यात आली आहे. एका ओळखीच्या व्यक्तीकडून सोने घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती परदेशातून दिल्लीला पोहोचली होती. विमानतळावर दाखल झाल्यानंतर तो शिवकुमारकडे सोने देत असतानाच कस्टमने मोठी कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. शिवकुमारकडून 55 लाख ऊपयांचे सोने जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवकुमार या सोन्याबाबत ठोस माहिती देऊ न शकल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. नंतर चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, खुद्द शशी थरूर यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘मी निवडणुकीच्या प्रचारासाठी धर्मशाळा येथे पोहोचलो असताना मला ही घटना समजली आणि मी थक्क झालो. ही व्यक्ती माझ्याकडे काही दिवस अर्धवेळ काम करत होती’, असे त्यांनी स्पष्ट केले. मी कोणत्याही कथित चुकीचे समर्थन करत नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देईन, असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.