महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

असंख्य आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद : कोहली

06:48 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने निवृत्त झालेल्या माजी सलामीवीर शिखर धवनबाबत हृदयस्पर्षी प्रतिक्रिया दिली असून अनेक संस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल त्याचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

Advertisement

2010 च्या सुमारास रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यासह विराट कोहली हे अव्वल त्रिकुट वनडे क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध व प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक फलंदाज बनले होते. ‘या डावखुऱ्या फलंदाजाने निर्भय व दणकेबाज फलंदाजीने सुरुवात करीत त्याने एक भरवशाचा फलंदाज असा लौकीक मिळविला. त्याची तीव्र आवड, खिलाडुवृत्ती व त्याचे स्माईल यापुढे आम्हाला चुकणार आहे. पण त्याचा वारसा यापुढेही कायम राहील. असंख्य आठवणी, अनेक अविस्मरणीय खेळी आणि नेहमी मनापासून नेतृत्व केल्याबद्दल धन्यवाद. निवृत्तीनंतरच्या नव्या इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा, गब्बर!’ असे कोहलीने एक्स हँडलवर धवनला शुभेच्छा देताना म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article