महाराष्ट्र फुटबॉल संघात कोल्हापूरच्या वरद खाडेची निवड
सबज्युनिअर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये करणार प्रतिनिधीत्व
कोल्हापूर प्रतिनिधी
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने सब-ज्युनिअर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप कॉम्पिटीशनमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संघ कोल्हापूरच्या वरद जर्नादन खाडेची निवड करण्यात आली आहे. बेंगळूर येथे सुऊ असलेल्या या स्पर्धेसाठी वरद हा संघासोबत रवाना झाला आहे.
दरम्यान, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) वतीने मुंबईतील कुपरेज मैदानावर कॉम्पिटीशनसाठी गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र संघ निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी केएसएच्या वतीने चार मुले पाठवली होती. डी. सी. नरके विद्यालयात शिकत असलेला वरद खाडे हा त्यापैकीच एक आहे. त्याने चाचणीत विफाच्या निवड समितीसमोर आपल्याकडील शुटींग, पासिंग आणि डॉजिंगचे स्कील दाखवले. समितीनेही वरदकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्र संघात स्थान देतानाच त्याच्याकडील स्कीलला न्याय दिली. वरदला केएसएचे पेट्रन-इन्-चीफ खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, पेट्रन् मेंबर संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) कार्यकारिणी सदस्य, विफाचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती आणि एआयएफएफ महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती, केएसए सचिव माणिक मंडलिक, ऑन. सहसचिव अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.