महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थलपति विजयच्या पक्षाला मिळाली मान्यता

06:21 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढविणार : द्रमुक-काँग्रेसला फटका बसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

दक्षिणेतील दिग्गज अभिनेता थलपति विजयने लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये तमिलगा वेत्री कजगम नावाच्या पक्षाची घोषणा केली होती. आता निवडणूक आयोगाने अधिकृतपणे त्याच्या पक्षाला मान्यता दिली आहे. अभिनेता विजयने रविवारी यासंबंधी माहिती दिली आहे. पक्षाला मिळालेली मान्यता म्हणजे आमच्यासाठी खुले झालेले यशाचे पहिले द्वार असल्याचे त्याने म्हटले आहे.

आम्ही 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षाला मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला होता. आमच्या अर्जाची कायदेशीर पडताळणी केल्यावर राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आमच्या तमिलगा वेत्री कझगम पक्षाला नोंदणीकृत केले आहे. तसेच आमच्या पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होण्याची मंजुरी दिली असल्याचे विजयने सांगितले आहे.

थलपति विजयचा तामिळनाडू, केरळ आणि दक्षिणेतील अन्य राज्यांमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. आमची संघटना सामाजिक न्यायाच्या मार्गांवर चालणार आहे. आमचा पक्ष जात आणि भ्रष्टाचारमुक्त होत काम करणार असल्याचा दावा विजयने राजकीय पक्ष स्थापन करताना केला होता. थलपति विजयच्या पक्षामुळे तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या द्रमुक अन् काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे.

पक्षध्वज अन् चिन्हही जारी

अभिनेता विजयने दोन आठवड्यांपूर्वी स्वत:चा पक्ष टीव्हीकेचा ध्वज आणि प्रतीक चिन्ह जारी केले होते. त्याच्या पक्षाच्या ध्वजात लाल आणि पिवळ्या रंगाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ध्वजावर दोन हत्ती आणि एक फूल साकारलेले आहे. पक्षाच्या सदस्यांसोबत लवकरच राज्यस्तरीय बैठका घेणार असून तेथे पक्षाच्या विचारसरणीच्या प्रचार-प्रसारावरून रणनीति तयार केली जाईल असे विजय यांनी म्हटले होते. पक्षाचे लक्ष्य आगामी 2026 विधानसभा निवडणूक लढविणे आणि जिंकणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. टीव्हीकेने लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला समर्थन दिले नव्हते तसेच स्वत:ही लोकसभा निवडणूक लढविली नव्हती.

Advertisement
Next Article