अहमदाबाद येथील ठकसेनाकडून इचलकरंजीतील उद्योजकांला 55 लाखांचा गंडा
अनिल गुप्ता, कुणाल गुप्त, निलम गुप्ता अशी संशयीत ठकसेनची नावे; शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल
इचलकरंजी प्रतिनिधी
शहरातील कापड उत्पादक उद्योजकांचा विश्वास संपादन करीत, कापड खरेदी करून, अहमदाबाद (राज्य गुजराज) येथील एका व्यक्तीने मुलगा आणि सुन यांच्या मदतीने 55 लाख 16 हजार 447 रूपयांला गंडा घातला. अनिल गिगराज गुप्ता, त्यांचा मुलगा कुणाल अनिल गुप्ता, सुन निलम कुणाल गुप्ता अशी त्या तिघां संशयीत ठेकसेनची नावे आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्याद कापड उत्पादक उद्योजक दिपक चर्तुभुज मुंदडा (रा. शेळकेनगर, लिंबू चौकालगत, रिंग रोड, इचलकरंजी) यांनी दिली आहे.
उद्योजक दिपक मुंदडा यांचा शहरात कापड उत्पादक करण्याचा कारखाना आहे. त्यांच्या कारखान्यात उत्पादीत होणारे कापड संशयीत अनिल गुप्ता, त्यांचा मुलगा कुणाल गुप्ता, सुन निलम गुप्ता हे तिघे संशयीत मे. कॉमेट टेक्सटाईल्स या फर्मच्या माध्यमातून खरेदी कऊ लागले. कापड खरेदी करण्याच्या माध्यमातून तिघा ठकसेननी उद्योजक मुंदडा यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी 76 लाख 40 हजार 765 ऊपये किंमतीचे कापड खरेदी केली. त्यापैकी 21 लाख 24 हजार 318 ऊपये थोडे-थोडे कऊन परत केले. पण उर्वरीत 55 लाख 16 हजार 447 ऊपये देण्यास वारंवार मागणी कऊन ही, देणे असलेली लाखो रूपये देण्यास टाळाटाळ करू लागले.
याच दरम्यान उद्योजक मुदंडा पैश्याच्या वसुलीसाठी ठकसेन गुप्ताच्या अहमदाबाद (राज्य गुजरात) येथील त्यांच्या कार्यायात गेले. त्यावेळी त्यांना ठकसेन अनिल गुप्ता, त्यांचा मुलगा कुणाल गुप्ता, सुन निलम गुप्ता या तिघांनी संगनमत करून, उद्योजक मुदंडा यांना जिवीतास बरे वाईट करण्याच्या धमकीबरोबर खोट्या गुन्हा अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे में कॉमेट टेक्सटाईल्स फर्मचे मालक अनिल गुप्ता, त्यांचा मुलगा कुणाल गुप्ता, सुन निलम गुप्ता या तिघांनी विश्वास संपादन करीत, कापड खरेदी करून, 55 लाख 16 हजार 447 ऊपयांला गंडा घातल्याच्या समोर आल्याने, त्यांनी शिवाजीनगर पोलिसात तिघा ठकसेन विरोधी फिर्याद दिली आहे.
ठकसेनच्या शोधासाठी पोलीस होणार रवानगी
कापड उत्पादक उद्योजक दिपक मुंदडा यांना अहमदाबाद (राज्य गुजराज) येथील अनिल गुप्ता, त्यांचा मुलगा कुणाल गुप्ता, सुन निलम गुप्ता या तिघा संशयीतांनी 55 लाख 16 हजार 447 रूपयांला गंडा घातला आहे. याविषयी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यांची गांभीर्याने दखल घेतली असून, या फसवणूक प्रकरणातील तिघा संशयीतांच्या शोधासाठी लवकरच पोलिसांचे एक पथक अहमदाबादला रवाना होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.