महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठकसेन प्रिया यादवने घातला आणखी 79 लाखांचा गंडा

12:18 PM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार बहिणींचे दागीने, रोकड लुटल्याची तक्रार

Advertisement

डिचोली : अनेकांना गंडवलेल्या व सध्या डिचोली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रिया यादव हिच्याविऊद्ध डिचोली पोलिसस्थानकात आणखी एक तक्रार सादर झाली असून डिचोली पोलिसांनी सदर गुन्हा नोंद करून घेतला आहे.डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती जयंती रघुनाथ वायंगणकर, बोर्डे डिचोली यांनी सदर तक्रार केली आहे. गेल्या 2017 ते 2024 या कालावधीत संशयित महिला प्रिया यादव हिने तक्रारदार वायंगणकर यांना रू. 35 लाख देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. वारंवार जमीन मालमत्ता खरेदी करायची आहे. रेल्वे स्टॉल्स खरेदी करायचे आहे. तसेच इतर खोटी कारणे सांगून पैसे मागितले. तिला आपण सोन्याच्या 2 बांगड्या, 3 अंगठ्या, 1 ब्रेसलेट दिले होते. परंतु ठराविक वेळेत सदर पैसे देण्यात प्रिया यादवने टाळाटाळ करुन शेवटी फसवणूक केली. तिने जयंती वायंगणकर यांच्या बहिणींकडूनही पैसे व सुवर्णलंकार उकळले आहेत. बहीण ललिता यांच्याकडून 36 लाख रू. व 116.630 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, मिलन यांच्याकडून साडेचार लाख रुपये व पूर्णा यांच्याकडून 3. 73 लाख रू. जमीन खरेदी, रेल्वे स्टॉल खरेदी करण्याच्या बहाण्याने उकळले होते. परंतु ते परत न करता फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी 420 कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. याही प्रकरणात प्रिया हिला अटक केली जाणार आहे, असे पोलिस स्थानकातून सांगण्यात आली आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article