For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सावंतवाडीत धडाडणार उद्या ठाकरेंची तोफ !

04:40 PM Feb 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत धडाडणार उद्या ठाकरेंची तोफ

सावंतवाडी -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ उद्या सावंतवाडीत धडाडणार आहे . दुपारी १२ . ३० वाजता ठाकरे सावंतवाडीत दाखल होणार आहेत . त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत . सावंतवाडी गांधी चौक येथे स्टेज उभारण्यात येणार तेथून उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत . शिवसेना पक्षफुटीनंतरचा हा ठाकरेंचा पहिलाच दौरा आहे .त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे . त्यामुळे मंत्री केसरकरांच्या मैदानात ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
×

.