For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमएसडीएफ संघाकडे टीएफपी चषक

10:03 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमएसडीएफ संघाकडे टीएफपी चषक
Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या टीएफपी चषक राज्यस्तरीय सात वर्षांखालील आंतरक्लब सेवन-ए-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएसडीएफ बेळगाव संघाने ईएसएसबी बेंगळूर संघाचा 4-3 अशा गोल फरकाने पराभव करुन टीएफपी चषक पटकाविला. बेंगळूर येथे खेळविण्यात आलेल्या राज्यस्तरीय सात वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेळगावच्या एमएसडीएफ संघाने टीएफपी बेंगळूर संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱ्या व पाचव्या मिनीटाला एमएसडीएफच्या जिदान जमादारने सलग दोन गोल करुन 2-0ची आघाडी मिळवून दिली. 18 व्या मिनीटाला जिदानच्या पासवर अन्वित सिद्दण्णावरने तिसरा गोल करुन पहिल्या सत्रात 3-0ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या  सत्रात 23 व्या मिनीटाला अन्वितच्या पासवर नमित शानभागने चौथा गोल केला तर 28 व्या मिनीटाला नमितच्या पासवरती जिदान जमादारने पाचवा गोल करुन 5-0 ची आघडीमिळवून दिली.

Advertisement

उपांत्यफेरीच्या सामन्यात एमएसडीएफने ऑलस्टार बेंगळूर संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 10 व्या मिनीटाला नमित शानभागच्या  पासवर जिदान जमादारने पहिला गोल केला. 14 व्या मिनीटाला अन्वित सिद्दण्णावरच्या पासवर अथर्व शिंपीने दुसरा गोल केला. 21 व्या मिनीटाला बचाव फळीला चकवत जिदानने तिसरा गोल करीत 3-0ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 25 व्या मिनीटाला अथर्वने बचाव फळीला चकवत चौथा गोल केला. अंतिम सामन्यात एमएसडीएफ बेळगाव संघाने ईएसएसबी बेंगळूरचा 4-3 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात जिदान जमादारने 13, 18 व 27 मिनीटला तीन गोल करुन स्पर्धेतील दुसरी हॅटट्रीक मिळविली. 21 व्या  मिनीटाला नमित शानभागने चौथा गोल केला. बेंगळूरतर्फे राजन्नाने 2 तर प्रसन्नजितने 1 गोल केला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या  एमएसडीएफ व उपविजेत्या ईएसएसबी संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्या आले. बेळगाव संघात जिदान जमादार, नमित शानभाग, नील मोटरे, श्रीहरी मगदूम, वीर गणेश, अथर्व शिंपी, अन्वित सिद्दण्णावर आदीं खेळाडूंचा सहभाग होता. या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.