कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ड्रोनमधून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण

06:06 AM Jul 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डीआरडीओची यशस्वी कामगिरी : यूएलपीजीएम-व्ही3मुळे वाढणार सैन्याचे सामर्थ्य

Advertisement

वृत्तसंस्था/ कुरनूल

Advertisement

भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. ड्रोनमधून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राचे शुक्रवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे परीक्षण भारतासाठी संरक्षण क्षेत्रात एक मोठी कामगिरी असल्याचे म्हटले आहे.

आंध्रप्रदेशच्या कुरनूलमध्ये नॅशनल ओपन रेंजमध्ये (एनओएआर) क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. भारताच्या संरक्षण क्षमतांना एक मोठी मजबुती देत डीआरडीओने आंध्रप्रदेशच्या कुरनूल येथील नॅशनल ओपन रेंजनमध्ये मानवरहित यानातून डागण्यात येणाऱ्या अचूक मारकक्षमता युक्त क्षेपणास्त्राचे (यूएलपीजीएम-व्ही3) यशस्वी परीक्षण केल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे.

यूएलपीजीएम-व्ही3 एक एक्सटेंडेड-रेंज वेरिएंट असून त्याला यूएलएम-ईआर देखील म्हटले जाते. बेंगळूर येथे 10-14 फेब्रुवारी या कालावधीत पार पडलेल्या एअरो इंडिया 2025 मध्ये देखील याला प्रदर्शित करण्यात आले होते. अदानी आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने यूएलपीजीएम-व्ही3 क्षेपणास्त्राला निर्माण केले आहे. तर डीआरडीओकडे याच्या विकास अन् परीक्षणाची जबाबदारी आहे. यूएलपीजीएमचे तीन वेरियंट असून यात यूएलपीजीएम व्ही1, यूएलपीजीएम व्ही2 आणि यूएलपीजीएम व्ही3 सामील आहे. या तिन्ही क्षेपणास्त्रांमध्ये मुख्यत्वे त्यांची कामगिरी आणि मारक पल्ल्याचे अंतर आहे.

यूएलपीजीएम व्ही3...

-हे एक आकाशातून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून ते दिवसा तसेच रात्रीच्या मोहिमेतही वापरले जाऊ शकते.

-क्षेपणास्त्रातील इमेजिन इन्फ्रारेड सीकर याला दिवसा तसेच रात्रीच्या मोहिमेसाठी सक्षम करतो आणि यात निष्क्रीय होमिंगची सुविधा आहे.

-या फायर-अँड फॉरगेट क्षेपणास्त्राचे वजन 12.5 किलोग्रॅम असून ते एक छोटी डुअलथ्रस्ट प्रोपल्शन युनिट संचालित करते.

-या क्षेपणास्त्राचा दिवसा मारकपल्ला 4 किलोमीटरपर्यंत तर रात्रीच्या वेळी 2.5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकते.

-विविध वॉरहेड्स अन् दारूगोळ्याचा वापर करता येईल अशाप्रकारे या क्षेपणास्त्राला डिझाइन करण्यात आले आहे.

-हे क्षेपणास्त्र मूव्हिंग टारगेट्स म्हणजेच गतिशील लक्ष्यांवरही हल्ला करण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article