सनरायझर्सविरुद्ध आज आरसीबीच्या गोलंदाजांची कसोटी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
aqयावेळी विजय मिळविण्यासाठी त्यांच्या गोलंदाजांना परिवर्तन घडवावे लागेल. रॉयल चॅलेंजर्सकडे अनेक प्रतिष्ठित खेळाडू आहेत, पण त्यांना त्याप्रमाणे कामगिरी घडविता आलेली नाही. सहा सामन्यांमधून एकमेव विजयासह संघ 10 व्या स्थानावर असून हा त्याचा पुरावा आहे.
या आयपीएलमधील आरसीबीच्या खराब कामगिरीचा थेट संबंध त्यांच्या गोलंदाजांच्या अकार्यक्षमतेशी आहे. बेंगळूरच्या गोलंदाजांचा दृष्टिकोन हा एकसुरी राहिला असून त्यामुळे फलंदाजांना त्यांचा सहज सामना करता येतो. मुंबई इंडियन्सविऊद्धचा सामना हे त्याचे उदाहरण आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी त्यांना 196 पर्यंत पोहोचविले. परंतु मुंबईने वानखेडे स्टेडियमवर अवघ्या 15.3 षटकांत हे लक्ष्य साधले. आरसीबीने सदर सामन्यात प्रति षटक 13 पेक्षा जास्त धावा दिल्या.
सनरायझर्सविऊद्ध अशी गोलंदाजी महागात पडण्याची शक्यता आहे, कारण त्यांची फलंदाजी मुंबईप्रमाणेच भक्कम आहे. हैदराबादचे दोन फलंदाज हेन्रिक क्लासेन (186) आणि अभिषेक शर्मा (177) हे आघाडीच्या 10 फलंदाजांमध्ये असून ट्रॅव्हिस हेडनेही (133) सातत्य राखले आहे. परंतु धावांच्या प्रमाणापेक्षा त्यांनी त्या कशा व केव्हा काढल्या ते अधिक महत्त्वपूर्ण आहे. क्लासेन, अभिषेक आणि हेड यांनी पॉवर प्ले आणि मधल्या वा शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीला फोडून काढले आहे.
याचा अर्थ असा नाही की, पाच सामन्यांतून सहा गुणांसह गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर असलेल्या सनरायझर्सचा कमकुवत दुवा नाही. आरसीबीप्रमाणेच गोलंदाजी ही या स्पर्धेत हैदराबादची समस्या राहिली आहे आणि फिरकीपटू शाहबाज अहमद तसेच मयंक मार्कंडे यांनी प्रति षटक 11 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. पण हैदराबाद संघाला कर्णधार पॅट कमिन्समध्ये तारणहार सापडला आहे. सहा बळींसह तो त्यांचा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे आणि त्याने प्रति षटक फक्त सात धावा दिल्या आहेत. याव्यतिरिक्त कमिन्सने सामन्याच्या विविध टप्प्यांवर गोलंदाजी करण्याची लवचिकता देखील दाखविली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन (5 बळी) याच्या समावेशामुळे गेल्या तीन सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजीला एक नवीन आयाम मिळाला आहे.
दुसरीकडे, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या ऑरेंज कॅपधारक आहे आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी मुंबईविऊद्ध अर्धशतके केल्याने संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. पण ग्लेन मॅक्सवेलचा (32 धावा) फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंह यादव, उमरान मलिक, नितीशकुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जे. सुब्रमण्यन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.